आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sunny Leone\'s Mother Who Died In 2008 Was From Sirmaur, Himachal Pradesh

हिमाचलच्या सिरमौरमध्ये सनी लिओनचे आजोळ, खरे नाव सनी नव्हे करनजीत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सनी लिओन)
शिमला : पोर्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणारी सनी लिओनचे आजोळ हे हिमाचलमधील सिरमौर जिल्ह्यात असल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का ? होय हे खरे आहे, सनी लिओनच्या आईचे माहेर सिरमौर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील आहे. पूजा भटच्या 'जिस्म 2' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये करिअरला सुरुवात करणारी सनी भारतीय वंशाची आहे.
कॅनडात पंजाबी कुटुंबात जन्मलेल्या सनी लिओनचे खरे नाव करनजीत कौर वोहरा असे आहे. सनीचे वडील तिबेटमधील आहे. दिल्लीत शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते आपल्या कुटुंबासोबत कॅनडात स्थायिक झाले. सनीची आई हिमाचल येथील सिरमौर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावातील आहे. स्वतः सनीने याची माहिती सोशल मीडियावर दिली. विकीपिडीयावरदेखील ही माहिती आता उपलब्ध आहे. सनीच्या आईचे 2008 मध्ये निधन झाले. सनीचे पोर्न सिनेमात काम करणे तिच्या आईवडिलांना पसंत नव्हते.
सनीला 'सनी लिओन' हे नाव पँटहाऊस मॅगझिनचे मालक बॉब गुशिऑनी यांनी दिले होते. त्यावेळी सनीने आपल्या करिअरची नुकतीच सुरुवात केली होती.
सनीने आता पोर्न इंडस्ट्रीला रामराम ठोकला असून बॉलिवूडकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे अस्तित्व निर्माण करण्यासाठी तिची धडपड सुरु आहे. बॉलिवूडमध्ये आत्तापर्यंत 'जिस्म 2', 'रागिनी एमएमएस 2', 'एक पहेली लीला' या सिनेमांत सनी झळकली आहे.
सनीचे आजोळ असलेला हिमाचलमधील सिरमौर हा जिल्हा अतिशय सुंदर असून येथे चूडधार, रेणुकासह अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सनी लिओनची रेअर छायाचित्रे...