आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान खानने भाडेतत्वावर दिली इमारत, दरमहा मिळणार 80 लाख रुपये भाडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खान - Divya Marathi
सलमान खान
अभिनेता सलमान खानने मुंबईतील वांद्रे परिसरात असलेल्या लिंकिंग रोडजवळील 2 हजार 140 चौरस फुटांची प्रॉपर्टी बिग बाजारचे मालक किशोर बियानी यांच्या ‘फ्युचर ग्रुप’ला भाडेतत्वावर दिली आहे. याच प्रॉपर्टीमधून सलमानला दरमहा 80 लाख रुपये मिळणार असून, पाच वर्षांसाठी  ही जागा भाडेतत्वावर देण्यात आली आहे. पहिल्या पाच वर्षांसाठी या जागेवर 80 लाख रुपयांचं भाडं असून त्यानंतर या जागेच्या भाड्यात वाढ करण्यात येणार असून 89.6 लाख रुपये इतकं भाडं आकारलं जाणार आहे.
 
2.4 कोटी घेतले डिपॉझिट.. 
- या प्रॉपर्टीसाठी सलमानने कंपनीकडून 2.4 कोटीं रुपये डिपॉझिट म्हणून घेतले आहेत. 
- पुढच्या आठवड्यात रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये ही डील फायनल होणार आहे. सलमानच्या वतीन त्याचे वडील सलीम खान यांनी संपूर्णपेपर वर्क केले आहे. 

पुढे वाचा, 120 कोटींना खरेदी केली सलमानने ही प्रॉपर्टी... 
बातम्या आणखी आहेत...