आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सलमानचा \'सुल्तान\' रिलीज होण्याच्या 24 तासांपूर्वीच झाला ऑनलाइन लीक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूडचा दंबगस्टार सलमान खानचा ‍'सुल्तान' सिनेमा रमजान ईदच्या मुहूर्तावर आज रिलीज झाला आहे. पण, सुल्तान रिलीज होण्याच्या 24 तासांपूर्वीच ऑनलाइन लीक झाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, यापूर्वी अनुराग कश्यप यांचा सिनेमा 'उडता पंजाब' देखील ऑनलाइन लीक झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, 'सुल्तान' रिलीज होण्याच्या एक दिवस आधी म्हणजे मंगळवारी ऑनलाइन लीक झाला होता. 'सुल्तान' आज (6 जुलै) देशभरातील 4500 स्क्रीनवर रिलीज झाला. ऐरव्ही देशात नवा सिनेमा आठवड्याच्या शुक्रवारी रिलीज होत असतो. पण, सलमानने रमजान ईदचा मुहूर्तावर बुधवारीचा आपला ‍बहुप्रतिक्षित सिनेमा रिलीज केला आहे.

2 तास 36 मिनिटांचा 'सुल्तान' झाला लीक...
- 'सुल्तान'ची कॉपी 'डार्कनेट'वर उपलब्ध असून ती लवकरच 'टॉरेंट'वर उपलब्ध होईल, असे सायबर क्राइमचे दीप शंकर यांनी सांगितले आहे.
- क्राइम इन्व्हेस्टिगेटर किसलय चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 तास 36 मिनिटांचा सिनेमा ऑनलाइन लीक झाला. अनेक वेबसाइटवर हा सिनेमा मंगळवारी दिसत होता. मात्र, तो तत्काळ ब्लॉक करण्यात आला. तसेच सिनेमाच्या यूआरएल (लिंक) डिलिट करण्‍यात आल्या आहेत.

निर्मात्यांनी फेटाळले वृत्त...
- यशराज फिल्मने सुल्तान सिनेमा ऑनलाइन लीक झाल्याचे वृत्त फेटाळले आहे. सिनेमाची अॅक्टिव्ह लिंक लीक झाली नसून ट्रेलरची मॉर्फ्ड कॉपी सोशल मीडियावर सर्कुलेट केली जात असल्याचे यशराज फिल्मने म्हटले आहे.

एका आठवड्यात दुसरा सिनेमा लीक...
- एका आठवड्यात दुसरा सिनेमा ऑनलाइन लीक झाल्याचे वृत्त आहे. याआधी दिग्दर्शक इंद्र कुमार यांचा 'ग्रेट ग्रॅंड मस्ती' लीक झाला होता. रिपोर्टनुसार, या सिनेमाची सेंसर बोर्ड कॉपी तीन दिवसांपूर्वी ऑनलाइन लीक झाली होती. सिनेमा जुलैमध्ये रिलीज होणार आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, सुल्तानचा रिव्ह्यू...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...