आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉफी शॉपमध्ये काम करायची श्रद्धा कपूर, बी टाऊनमध्ये फेमस होण्यापूर्वी सेलिब्रिटींनी केले \'हे\' काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘आशिकी 2’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री श्रद्धा कपूर सध्याच्या घडीला आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. पण, अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ती एक वेगळच काम करत होती. बऱ्याच बी टाऊन कलाकारांच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे प्रोफेशन वेगळे असल्याचे आपण पाहिले् आहे. श्रद्धाही त्यापैकीच एक आहे. 
 
कॉफी शॉपमध्ये काम करायची श्रद्धा... 
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी ती बोस्टनमध्ये एका कॉफी शॉपमध्ये काम करत होती. तुमचाही विश्वास बसत नाहीये ना, पण हे खरं आहे. श्रद्धा शिक्षणाच्या निमित्ताने काही वर्षे बोस्टनमध्ये होती. शिक्षण सुरु असतानाच तिने काम करण्याचा निर्णय घेतला होता. काम करुन स्वावलंबी होण्यासाठी आणि हातात चार पैसे यावेत यासाठी तिने हे काम करण्याचा निर्णय घेतला होता. बोस्टनमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतात परतल्यानंतर श्रद्धाने बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याचा निर्णय घेतला. श्रद्धा लवकरच अपू्र्व लाखिया दिग्दर्शित ‘हसीना पारकर’ या सिनेमातून मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या सिनेमात ती कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या म्हणजेच हसीना पारकरच्या भूमिकेत झळकणार आहे. 

श्रद्धाप्रमाणेच बॉलिवूडमध्ये पदार्पणापुर्वी कुणी वॉचमन म्हणून काम केले, तर कुणी बस कंडक्टर आणि वेटर म्हणून काम केले. एक नजर टाकुया, अशाच आणखी काही बॉलिवूड स्टार्सवर जे सिनेसृष्टीत येण्यापूर्वी वेगळे आयुष्य जगले...
बातम्या आणखी आहेत...