आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉलिवूडची ही बोल्ड अॅक्ट्रेस झाली बौद्ध धर्माची अनुयायी, जाणून घ्या काय आहे कारण?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः अभिनेत्री सुरवीन चावलाची ओळख बॉलिवूडमध्ये बोल्ड अभिनेत्रीच्या रुपात आहे. मात्र आता तिच्या व्यक्तीमत्वात कमालीचा बदल घडून आला आहे. सुरवीनला आता आध्यात्माची ओढ लागली आहे. याविषयी ती म्हणते, "मी आध्यात्माकडे वळली याचा अर्थ मी सन्यांस घेतेय, असा नाही. माझ्या मनाचे मला गुलाम व्हायचे नाहीये. आपले मन आपल्याला भौतिक गोष्टींकडे वळवतं. प्रसिद्धी, पैशाकडे आपण आकर्षित होतो... या सर्वांचे आपण गुलाम बनतो."

आणखी काय म्हणाली सुरवीन...

"मी या सगळ्यांसोबत राहणार आहे, मात्र या गोष्टींची मला दासी व्हायचे नाही. मला स्वतःच्या अडचणी ओळखणे शक्य झाले आहे. आता मला मनाच्या अडचणी शोधून त्यावर तोडगा काढायचा आहे आणि एक चांगली व्यक्ती बनायचे आहे. यासाठी मी बौद्ध साहित्याचा अभ्यास करत आहे. जापानमध्ये एक मेंटर आहेत, त्यांच्याकडून मला आध्यात्माचा मार्ग गवसला. आता मी 'पावर ऑफ नाऊ' हे पुस्तक वाचत आहे. जेणेकरुन मला आयुष्य आणि आनंद याचा अर्थ समजेल."


तीन महिन्यांपासून करतेय योग प्रॅक्टिस...

सुरवीन सांगते, "सकाळी आठ वाजता गजर होताच माझे डोळे उघडतात. सर्वप्रथम मी योगा करते. अष्टांग योग प्रमुख आहे. तीन महिन्यांपासून मी योग प्रॅक्टिस करत आहे. माझी इंस्ट्रक्टर क्लोई आहे. जी योग्य पद्धतीने मला आसन शिकवतेय. जेवणात तूप भरपूर खाते. डायट चार्टमधून पोळी गायब आहे. मात्र भाताचा समावेश आहे. डायटिशिअनच्या सल्ल्यानुसारच जेवण घेते. जेवण न करता तुम्ही सुंदर दिसू शकत नाही. हेल्दी राहून तुम्ही सुंदर दिसता. आजीच्या बटव्यातील गोष्टी आपण विसरायला नकोत. शरीरात साखरेचे अधिक प्रमाण जात नाही. लुब्रिकेंट पोहोचत नाहीत. तुप असो वा कुकिंग ऑईल सर्व फॅट फ्री आहे. थोडे फॅट शरीरात असणे गरजेचे आहे. घरी बनवलेले तूप-दही मला अधिक आवडतं."


इंग्रजी सिनेमे अधिक बघते...

''इंग्रजी सिनेमे मी अधिक बघते. जॉनर ड्रामा आणि त्यातील अॅक्शन मला पसंत आहे. रोमँटिक सिनेमे मला आवडत नाहीत. इंटेंस, हार्डकोर लव्ह स्टोरीत काम करायची माझी इच्छा आहे. मात्र तरीसुद्धा असे सिनेमे मी बघत नाही, कारण चांगल्या प्रेमकथा आता बनतच नाहीत.'' सुरवीन विचारते, 'कयामत से कयामत तक' नंतर एखादी ट्रेडिशन लव्ह स्टोरी बनली आहे का? याचे कारण म्हणजे आजच्या काळात इमोशन्स गायब झाले आहेत.

एक्सरसाइज मंत्र...

सुरवीन दररोज दोन तास जिमिंग करते. यामध्ये वेट ट्रेनिंग आणि फंक्शनिंगचा समावेश आहे. याशिवाय ४५ मिनिटे कार्डिओसुद्धा करते.


पुढील स्लाईड्समध्ये बघा, सुरवीन चावलाची बोल्ड झलक...