आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बॉलिवूडपासून ते बिझनेसमनपर्यंत, तब्बल 10 जणांसोबत होते सुश्मिता सेनचे अफेअर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः अभिनेत्री सुष्मिता सेन आणि रितिक भसीन  चार वर्षांच्या रिलेशनशिपनंतर आता वेगळे झाले आहेत.  सूत्रांच्या माहितीनुसार, सुष्मिता-रितिकच्या काही मित्रांनी ही गोष्ट उघड केली आहे. हे दोघे गेल्या सहा महिन्यांपासून सोबत नाहीत. 


अनेक नाइट क्लब्सचा मालक आहे रितिक...

37 वर्षीय रितिक भसीन अनेक नाइटक्लब्सचा मालक आहे. 42 वर्षीय सुश्मितापू्र्वी तो अंबिका खेतानसोबत रिलेशनशिपमध्ये होता. काही दिवसांपूर्वीच रितीकच्या एका नाइट क्लबवर धाड पडली होती. यावेळी पोलिसांसोबत गैरवर्तणूक केल्याने रितिकला अटक झाली होती. यूएसमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने मुंबईतून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले होते. अर्जुन कपूर आणि अभिषेक कपूरसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी त्याचे चांगले मित्र आहेत. तर टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकांसोबतही त्याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. शशी थडानी आणि सनी साराच्या Orion Entertainment या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत त्याची पार्टनरशिपसुद्धा आहे.

 

तर सुश्मिताविषयी बोलायचे झाल्यास, तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरले नाही. पण मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. वयाच्या  25 वर्षी तिने रीनी नावाच्या मुलीला दत्तक घेतले होते. त्यानंतर पुन्हा एकदा सुश्मिताने एका मुलीला दत्तक घेतले. तिचे नाव अलीशा आहे. रीनी आता 18 वर्षांची तर अलीशा 7 वर्षांची आहे.

 

सुश्मिता आपल्या रिलेशनशिपविषयी नेहमी ओपन राहिली आहे. रितिकपूर्वी तब्बल नऊ जणांसोबत तिचे अफेअर राहिले आहे. विक्रम भट्ट यांच्यापासून ते अनेक पुरुषांसह तिचे लिंकअप झाले होते... या सगळ्या अफेअर्सबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...