Home »Gossip» Sushmita Sen Enjoying Party Last Night With Boyfriend Ritik Bhasin

ब्रेकअपची चर्चा सुरु असतानाच BF सोबत दिसली सुश्मिता, यापूर्वी 9 जणांसोबत होते अफेअर

दिव्य मराठी वेब टीम | Dec 07, 2017, 11:30 AM IST

मुंबईः अभिनेत्री सुश्मिता सेन तिचा बॉयफ्रेंड रितिक भसीनपासून विभक्त झाल्याची चर्चा होती. मतभेद निर्माण झाल्याने सुश्मिताने रितिकसोबत ब्रेकअप केल्याचे म्हटले गेले होते. पण अलीकडेच हे दोघे मुबंईतील केम्प्स कॉर्नर येथे एकत्र पार्टी करताना दिसले. या पार्टीत सुश्मिता रितिकसोबत कम्फर्टेबल दिसली. पार्टीत या दोघांसोबत त्यांचे काही जवळचे मित्र उपस्थि होते. दोघे एकत्र आल्याने त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना पुर्णविराम मिळाला, असे म्हणायला हरकत नाही. गेल्या चार वर्षांपासून हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत.


जहीर-सागरिकाच्या लग्नात पोहोचले होते एकत्र...
अलीकडेच हे दोघे जहीर खान आणि सागरिका घाटगे यांच्या लग्नातसुद्धा एकत्र दिसले होते. इतकेच नाही तर त्यांच्या रिसेप्शन पार्टीतही दोघे सोबतच होते.


अनेक नाइट क्लब्सचा मालक आहे रितिक...
37 वर्षीय रितिक भसीन अनेक नाइट क्लब्सचा मालक आहे. 42 वर्षीय सुश्मितापू्र्वी तो अंबिका खेतानसोबत रिलेशनशिपमध्ये होता. काही दिवसांपूर्वीच रितीकच्या एका नाइट क्लबवर धाड पडली होती. यावेळी पोलिसांसोबत गैरवर्तणूक केल्याने रितिकला अटक झाली होती. यूएसमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने मुंबईतून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले होते. अर्जुन कपूर आणि अभिषेक कपूरसह बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी त्याचे चांगले मित्र आहेत. तर टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकांसोबतही त्याचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. शशी थडानी आणि सनी साराच्या Orion Entertainment या इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीत त्याची पार्टनरशिपसुद्धा आहे.
तर सुश्मिताविषयी बोलायचे झाल्यास, तिचे फिल्मी करिअर फारसे यशस्वी ठरले नाही. पण मिस युनिव्हर्सचा किताब जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे. वयाच्या 25 वर्षी तिने रीनी नावाच्या मुलीला दत्तक घेतले होते. त्यानंतर पुन्हा एकदा सुश्मिताने एका मुलीला दत्तक घेतले. तिचे नाव अलीशा आहे. रीनी आता 18 वर्षांची तर अलीशा 7 वर्षांची आहे.


रितिकपूर्वी 9 जणांसोबत होते सुश्मिताचे अफेअर
सुश्मिता आपल्या रिलेशनशिपविषयी नेहमी ओपन राहिली आहे. रितिकपूर्वी तब्बल नऊ जणांसोबत तिचे अफेअर राहिले आहे. विक्रम भट्ट यांच्यापासून ते अनेक पुरुषांसह तिचे लिंकअप झाले होते... या सगळ्या अफेअर्सबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

Next Article

Recommended