आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिस युनिव्हर्स होऊन लोटली 22 वर्षे, मात्र आजही तितकीच ग्लॅमरस आहे 40 वर्षीय सुश्मिता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः मिस युनिव्हर्स आणि बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन सोशल मीडियावर अॅक्टिव आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने इंस्टाग्रामवर डेब्यू केले. 40 वर्षीय सुश्मिता इंस्टाग्रामवर व्हेकेशन आणि आपले ग्लॅमरस फोटोशूट्स शेअर करत असते. शिवाय तिच्या दोन मुली रेने आणि आलिशाचे फोटोजसुद्धा ती नित्यनेमाने शेअर करते. वयाच्या 18 व्या वर्षी ठरली मिस युनिव्हर्स

सुश्मिता सेनला मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावी करुन 22 वर्षांचा काळ लोटला आहे. 21 मे 1994 रोजी वयाच्या 18 व्या वर्षी सुश्मिताने मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केले आणि मिस युनिव्हर्सचा ताज आपल्या नावी करणारी पहिली भारतीय महिला ठरली. सुश्मिताची गणना आजदेखील यशस्वी मॉडेल्समध्ये होते. मात्र अभिनेत्री म्हणून ती कमी पडली. 1996 साली दस्तक या सिनेमातूने तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण फारसे हिट सिनेमे तिच्या नावी जमा होऊ शकले नाहीत. 'बीवी नंबर वन', 'मैंने प्यार क्यों किया', 'मैं हूं ना' असे निवडक सिनेमे केल्यानंतर सुश्मिताने बॉलिवूडपासून दूर राहणे पसंत केले. रेने आणि आलिशा या तिच्या दत्तक घेतलेल्या मुली आहेत. 40 वर्षीय सुश्मिता या दोन मुलींची सिंगर पेरेंट आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पहिल्यांदाच बघा सुष्मिता सेनचे Instagram Photos...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...