आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 41व्या वर्षी सुष्मिता सेनने फ्लॉन्ट केले अॅब्स, अशी ठेवते स्वतःला फिट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंस्टाग्रामवर सुष्मिताने तिचा ताजा फोटो शेअर केला आहे. - Divya Marathi
इंस्टाग्रामवर सुष्मिताने तिचा ताजा फोटो शेअर केला आहे.
बॉलिवूड अॅक्ट्रेस सुष्मिता सेनने एक फोटो तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यामध्ये सुष्मिता तिचे अॅब्स शो करताना दिसते. सुष्मिताने तोंडाने टी-शर्ट पकडले आहे आणि ती अॅब्स दाखवत आहे. हा फोटो शेअर करताना सुष्मिता सेनने एक मेसेज दिला आहे. त्यात म्हटले आहे, की 'Slowly but surely!!!💪😁❤️ I begin training again post all my travels to meet the body I want as my 42nd birthday month begins!!!💃🏻😍👏❤️😄 let some SAY it can’t be done...I’ll keep it simple & just DO it!!!😉😄👍 My body...My rules!! Every year I celebrate every line..be it on my body or on my face!!! I have earned them!!!💪😊😍👍'.  
- सुष्मिता 19 नोव्हेंबरला 42 वर्षांची होत आहे. त्याआधी तिने ती कशी फिट आहे हे दाखवले आहे. 
 
स्वतःला अशी फिट ठेवते सुष्मिता 
- सुष्मिता स्वतःला फिट ठेवण्यासाठी खूप मेहनत घेते. गेल्या काही दिवसांतील बातम्यानुसार सुष्मिता स्ल्पिट डिस्क सारख्या आजाराने त्रस्त होती. यामुळे जिममध्ये ती व्यायाम करु शकत नव्हती. यानंतरही तिने योगा आणि डान्सच्या माध्यमातून स्वतःला फिट ठेवले. 
- सुष्मिता प्रत्येक आठवड्याला वर्कआऊटमध्ये बदल करते. ती रनिंग, कार्डियो आणि एरियल करते. 
- सुष्मिता हेल्दी डाएट आणि मेडिटेशन देखील करते. 
- सुष्मिताने दस्तक (1996) द्वारे बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. तिचा सिर्फ तूम (1999), बिवी नं. 1 (1999), आंखे (2002),  'तुमको ना भूल पाएंगे' (2002), 'मैं हूं ना' (2004), 'मैंने प्यार क्यों किया' (2005), 'बेवफा' (2005) यासह अनेक चित्रपटांमध्ये काम केले. 
तिचा शेवटचा चित्रपट होता 2010 मध्ये आलेला 'नो प्रॉब्लेम'.
 
पुढील स्लाइडमध्ये पाहा, फिट राहाण्यासाठी सुष्मिता काय-काय करते... 
बातम्या आणखी आहेत...