मागील शनिवारी (9 जानेवारी) बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा बर्थडे होता आणि त्याने फ्रेंड्ससाठी एक शानदार पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत, शाहरुख खान, रणवीर सिंह, अर्जुन कपूर, अमिषा पटेल, करण जोहरसह अनेक कलाकार पोहोचले होते.
परंतु या पार्टीत हृतिकची पूर्वाश्रमीची पत्नी सुझान खान दिसली नाही. केवळ सुझानच नव्हे अभिनेता अर्जुन रामपालसुध्दा दिसला नाही. अर्जुनसोबत सुझानचे अफेअरस असल्याच्या चर्चा होत्या. मात्र अर्जुन आणि सुझान दोघांनी या बातम्यांचे खंडन केले.
एका प्रतिष्ठीत वेबसाइटवर आलेल्या बातमीनुसार, या पार्टीत उपस्थित न राहिल्याविषयी सुझानने सांगितले आहे. सुझान सांगते, 'मला या पार्टीत आमंत्रित करण्यात आले नव्हते. आम्ही बर्थडे पार्टीत एकमेकांना बोलवत नाही. परंतु एकमेकांना शुभेच्छा देतो. हृतिक आणि माझे नाते चांगले आहे. आम्ही पालक आहोत आणि आमचे प्रधान्य मुले आहेत. आम्ही सोशल इव्हेंट्समध्ये एकक्ष जात नाही आणि मित्रांसोबतही बाहेर जात नाहीत.'
हृतिक आणि सुझान 2013मध्ये विभक्त झाले आहेत. सुझान पेशाने इंटीरिअर डिझाइनर आहे आणि ती दोन्ही मुलांसोबत वेगळी राहते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा हृतिक रोशन आणि सुझानचे घटस्फोटापूर्वीचे काही फोटो...