(फाइल फोटोः स्वस्तिका मुखर्जी)
कोलकाता : सुशांत सिंह राजपूत स्टारर 'डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी बंगाली ब्युटी म्हणजे स्वस्तिका मुखर्जी. पहिल्याच हिंदी सिनेमातून
आपल्या बोल्ड अदांनी स्वस्तिकाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता लवकरच ती आणखी एका सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. तिच्या या नवीन सिनेमाचे नाव आहे 'फॅमिली अल्बम'. या सिनेमात ती बंगाली बाला पाओली दामसोबत स्क्रिन शेअर करताना दिसेल. दोन तरुणींच्या नात्यावर सिनेमाची कथा आधारित आहे.
बातमी आहे, की या सिनेमात स्वस्तिका एका लेस्बियन तरुणीची भूमिका साकारणार आहे. पाओलीसोबतच्या ऑन स्क्रिन केमिस्ट्रीमुळे प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया उमटणार, याची स्वस्तिकाला मुळीच काळजी वाटत नाही.
आपल्या या भूमिकेविषयी स्वस्तिका म्हणते, "माझी भूमिका ही पाओलीच्या आयुष्यातील एका खास व्यक्तीची असेल. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक खास व्यक्ती असतो. या सिनेमात मी जी भूमिका वठवणार आहे, ती आपल्या कुटुंबीय आणि मित्र परिवाराशी खूप जवळ आहे. हा असा एक सिनेमा असेल जो प्रत्येकजण आपल्या कुटुंबासोबत बसून बघू शकेल. या सिनेमात काहीच वल्गर नसेल. माझी ही भूमिकासुद्धा प्रेक्षक नक्की स्वीकारतील, अशी मला आशा आहे."
विशेष म्हणजे स्वस्तिकाने यापूर्वी डिटेक्टिव ब्योमकेश बक्शी या सिनेमातसुद्धा बोल्ड भूमिका वठवली होती. आता पुन्हा एकदा बोल्ड भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास ती सज्ज आहे. बॉलिवूडमध्ये नव्याने उदयास येणारी ही बोल्ड अभिनेत्री कोण आहे, तिची पार्श्वभूमी काय आहे, हे जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये....
पुढे वाचा, 14 वर्षाच्या मुलीची आई आहे स्वस्तिका...