आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

45 वर्षांच्या तब्बूचा खुलासा, \'अजय देवगनमुळे अजून झाले नाही माझे लग्न\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'विजयपथ'च्या एका सीनमध्ये अजय देवगन आणि तब्बू. - Divya Marathi
'विजयपथ'च्या एका सीनमध्ये अजय देवगन आणि तब्बू.
मुंबई - बॉलिवूड अॅक्ट्रेस तब्बू 45 वर्षांची झाली आहे, मात्र अद्याप तिने लग्न केलेले नाही. यामागच्या कारणाचा तब्बूने नुकताच खुलासा केला आहे. तब्बूच्या म्हणते ती अजय देवगनमुळे अद्याप अविवाहित आहे. एका पब्लिकेशनबरोबर बोलताना तब्बू म्हणाली की, अजयने जे केले त्याबद्दल त्याला नक्कीच वाईट वाटत असणार. 

असे काय केले अजयने.. 
तब्बू म्हणाली, मी आणि अजय 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. अजय माझा कझिन समीर आर्यचा शेजारी आणि जवळचा मित्रही होता. मी जेव्हा छोटी होते, त्यावेळी समीर आणि अजय माझ्यावर लक्ष ठेवून असायचे. मला एखाद्या मुलाशी बोलताना पाहिले की, ते त्या मुलाची धुलाई करायचे. दोघे त्यावेळी फार गुंडगिरी करायचे. 

अजयला म्हणते, माझ्यासाठी मुलगा शोध... 
- रिपोर्ट्सनुसार अजयची खास मैत्रीण असलेल्या तब्बूचे लग्न व्हावे अशी त्याची इच्छा आहे. त्याबाबत तब्बू गमतीत म्हणते की, मी अजयला नेहमी म्हणत असते की, माझ्यासाठी एखादा सुटेबल मुलगा शोध. 
- तब्बू म्हणाली, माझे आणि अजयचे नाते फार चांगले आहे. सर्व मेल अॅक्टर्समध्ये माझ्यासाठी अजय सर्वात महत्त्वाचा आहे. तो अगदी लहान मुलांसारखा आणि खूप प्रोटेक्टीव्ह आहे. 

अनेक चित्रपटांत तब्बू-अजयने केले एकत्र काम 
- अजय आणि तब्बू यांनी 'विजयपथ' (1994), 'हकीकत' (1995), 'तक्षक' (1999) आणि 'दृश्यम' मध्ये एकत्र काम केले आहे. 
- रोहित शेट्टीचा अपकमिंग चित्रपट 'गोलमाल अगेन' मध्येही दोघे एकत्र झळकणार आहेत. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, तब्बूचे काही PHOTOS.. 
बातम्या आणखी आहेत...