आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःला अशी फिट ठेवते तब्बू, म्हणाली - \'काय करु पोटापाण्याचा प्रश्न आहे\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः आज (4 नोव्हेंबर) तब्बू आपला 46वा वाढदिवस साजरा करत आहे. 1980 साली रिलीज झालेल्या ‘बाजार’ या चित्रपटाद्वारे तब्बूने बालकलाकाराच्या रुपात अभिनयाला सुरुवात केली. लीड अॅक्ट्रेस म्हणून तिचा पहिला चित्रपट ‘कुली नंबर 1’ (साऊथ चित्रपट) हा होता.  तर बॉलिवूडमध्ये तिने ‘पहला पहला प्यार’द्वारे डेब्यू केले होते. उल्लेखनीय गोष्ट म्हणजे पदार्पणापासून ते आतापर्यंत तब्बू अतिसय फिट आहे. फिटनेसपासून ते वाढदिवसाच्या आठवणी तब्बूने Divyamarathi.comसोबत शेअर केल्या आहेत.
 
तू अगदी सुरुवातीपासून अतिशट फिट आहेस, स्वतःला तू कशी मेंटेन ठेवते?
>  मी उपाशी राहते (हसून)... खरं सांगायचं म्हणजे मी जे काही खाते त्यावर विशेष लक्ष देते. कारण मी लठ्ठपणा अफोर्ड करु शकत नाही. शेवटी पोटापाण्याचा प्रश्न आहे. इंडस्ट्रीत राहायचे असेल तर स्वतःला फिट ठेवावचं लागतं. एक्सरसाइज आणि योगावर मी लक्ष देते. 
 
बॉलिवूडचा प्रवास एका शब्दांत सांगायचा झाल्यास, ते कसं सांगशील?
> अॅक्सीडेंटल आणि आशा करते, की या प्रवास मी कुणाला इजा पोहोचवली नसावी. (हसून) 

पुढील स्लाईड्सवर वाचा, आणखी काय काय म्हणाली तब्बू...
बातम्या आणखी आहेत...