नागार्जुनसोबत तब्बू, उजवीकडे तब्बू
बॉलिवूड अभिनेत्री तब्बू आज 44वा वाढदिवस साजरा करत आहे. 4 नोव्हेंबर 1971ला जन्मलेल्या तब्बूचे खरे नाव तब्बसुम आहे. 80 आणि 90 च्या दशकाची अभिनेत्री फराह नाज तिची थोरली बहीण होती. ती गतकाळातील अभिनेत्री शबाना आझमी आणि बाबा आझमी यांची भाची आहे. फिल्मी बॅकग्राऊंड असल्याने तब्बूला बालपणापासूनच सिनेमांत येण्याची आवड होती. तिने वयाच्या 14व्या वर्षी देवानंद यांच्या 'हम नौजवान' सिनेमात काम केले होते.
वयाच्या 14व्या वर्षी साकारली बलात्कार पीडितेची भूमिका
तब्बूला लाँच करण्याचे श्रेय दिग्गज अभिनेते देवानंद यांना जाते. त्यांनी 'हम नौजवान'मध्ये तब्बूला
आपल्या मूलीच्या रुपात निवडले होते. या सिनेमात तब्बू 14 वर्षांचीच होती. तिने एका बलात्कार पीडितेची भूमिका साकारली होती.
रेकॉर्ड अवॉर्ड्स आहेत तब्बूच्या नावे-
"माचिस", "विरासत", "हू तू तू", "अस्तित्व", "चांदनी बार", "मकबूल", “चीनी कम” "द नेमसेक", “हैदर” आणि “दृश्यम”सारख्या दमदार सिनेमांत काम करणारी तब्बू बॉलिवूडची अशी अभिनेत्री आहे, जिच्या नावे रेकॉर्ड अवॉर्ड्स आहेत. तिने फिल्मफेअरमध्ये आतापर्यंत चार उत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटिक्स) पुरस्कार मिळवले आहेत. शिवाय तिने फिल्मफेअर उत्कृषअट महिला डेब्यू आणि उत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीचे 2 राष्ट्रीय पुरस्कार नावी केले आहेत.
दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुन होते अफेअर-
दिग्दर्शक साजिद नाडियाडवालाला डेट केलेल्या तब्बूचे नाव दाक्षिणात्य अभिनेता नागार्जुनसोबत जुळले होते. यांच्या अफेअर खूप चर्चा एकवटली होती. परंतु दोघांचे नाते पुढे जाऊ शकले नाही. नागार्जुन विवाहित होते आणि त्यांना आपल्या पत्नीला घटस्फोट द्यायचा नव्हता. आपल्या नात्याचे काहीच भविष्य नाहीये याची जाणीव झाल्यानंतर तब्बूने नागार्जुनसोबतचे नाते तोडले. आता ती सिंगल आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या तब्बूविषयी काही रंजक गोष्टी...