Home »Gossip» Taimur Ali Khan Get Pre Birthday Gift From Daddy Saif Ali Khan

बर्थडेच्या आधी सैफ अली खानने तैमूरला गिफ्ट केली 1.30 कोटींची गाडी

दिव्य मराठी वेब टीम | Nov 14, 2017, 16:26 PM IST

  • आई करीनासोबत तैमूर. तैमूरचे पापा सैफने खरेदी केली 1.30 कोटींची जीप.
मुंबई - सैफ अली खानने त्याचा आणि करीनाचा मुलगा तैमूर अली खानला वाढदिवसाच्या एक महिना आधी एक जीप गिफ्ट दिली आहे. 11 महिन्यांच्या तैमूरसाठी जीपमध्ये स्पेशल बेबी सीट लावण्यात आली आहे. सैफने सोमवारी सायंकाळी शोरुममध्ये जाऊन जीप खरेदी केली. सैफने लाल रंगाची एसआरटी गाडी खरेदी केली, या जीपची किंमत 1.30 कोटी रुपये आहे. गाडी खरेदीसाठी आलेल्या सैफने मीडियाला सांगितले, की तो ही जीप तैमुरला गिफ्ट देणार आहे. तैमुरच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त मी ही जीप त्याला गिफ्ट देत आहे. त्याला लाल रंग आवडतो. त्यामुळे त्याच्या आवडीचा रंग निवडला आहे. सुरक्षेची काळजी घेत जीपमध्ये तैमूरसाठी बेबी सीट लावण्यात आले आहे.
20 डिसेंबरला एक वर्षांचा होणार तैमूर
- करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर 20 डिसेंबरला एक वर्षांचा होणार आहे. तैमूरची मावसी करिश्मा कपूरने सांगितले आहे, की तैमूरच्या बर्थडे निमित्त फॅमिली गेट-टुगेदरचे प्लॅनिंग केले आहे. कोणतेही मोठे सेलिब्रेशन होणार नाही. यात फक्त करीना आणि सैफ या दोघांच्या फॅमिलीचे मेंबर्स असणार आहेत.
- दुसरीकडे अशीही चर्चा आहे, की हा दिवस मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्याची प्लॅनिंग करीना आणि सैफने केली आहे. तैमूरची आजी शर्मिला टागोरही तैमूरच्या वाढदिवसासाठी दिल्लीहून मुंबईला येण्यासाठी उत्सूक आहे.

Next Article

Recommended