आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई करीनापेक्षा महागडे असतात तैमूरचे कपडे, बुटांची किंमत ऐकून तर चक्रावून जाल!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री करीना कपूर खान याकाळात मदरहून एन्जॉय करत आहे. सोबतच ती स्वतःच्या फिटनेसकडेही कटाक्षाने लक्ष देताना दिसतेय. करीनाने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात मुलगा तैमूरला जन्म दिला. तैमूर आता सहा महिन्यांचा झाला आहे. आपल्या चिमुकल्यासोबत करीना सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावताना दिसतेय. कधी तैमूर आईसोबत तर कधी त्याच्या आयासोबत आउटिंग करताना दिसतो.

कुर्ता-पायजामात दिसला तैमूर... 
नुकताच तैमूरचा एक लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर आला आहे. यामध्ये तो व्हाइट कुर्ता-पायजामात दिसतोय. चिमुकला तैमूर अगदी त्याची आई करीनाची कार्बन कॉपी दिसतोय. तैमूरचा जेव्हाही एखादा नवीन फोटो समोर येतो, तेव्हा या चिमुकल्याच्या क्यूटनेससोबत त्याची ड्रेसिंग स्टाइल बघण्यासारखी असते. आतापर्यंतच्या सर्व फोटोजमध्ये त्याचा वेगळा लूक बघायला मिळाला आहे. यावेळी कुर्ता-पायजामात तैमूर अतिशय गोंडस दिसतोय. करीना तैमूरला स्वतःप्रमाणेच स्टायलिश बनवत आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

तैमूरसाठी महागडे ब्रॅण्डेड कपडे-बूट... 
करीना आपल्या मुलाच्या कपडे आणि बुटांवर विशेष लक्ष देते. त्याच्यासाठी ती फक्त ब्रॅण्डेड कपडे खरेदी करते. गूसी, राल्फ लॉरेन आणि रॉबर्टो कवाली या मोठ्या ब्रॅण्डचे कपडे आणि बूट करीना तैमूरसाठी खरेदी करते.  तैमूर आता केवळ सहा महिन्यांचा आहे. पण त्याची स्टाइल करीनापेक्षा महागडी आहे. त्याच्या एका टीशर्टची किंमत 5 हजार रुपये असते. सोबतच बुट आणि पँटची किंमत दहा हजारांच्या घरात असते. 

शूजची किंमत 13 हजार रुपये..   
करीनाजवळ स्वतःचे एक मोठे शू कलेक्शन आहे. अगदी त्याचप्रमाणे ती तैमूरसाठीही एक मोठे कलेक्शन तयार करत आहे. तैमूरजवळ काही फ्रेंच ब्रॅण्डचेही बूट आहेत. त्यांची किंमत 13 हजार रुपये आहे. अवघ्या सहा महिन्यांच्या तैमूरचे हे फॅशन स्टेटस अवाक् करणारे आहे.  
 
करीनाने तैमूरला कधीच मीडियापासून लपवून ठेवले नाही. तुषार कपूरचा मुलगा लक्ष कपूरच्या बर्थडे पार्टीत करीनाने तैमूरसोबत मीडियाला पोज दिली होती.  पहिल्याच पब्लिक अपिअरन्समध्ये तैमूर त्याची आई करीनाप्रमाणेच अतिशय स्टायलिश असल्याचे दिसले होते. प्रत्येक फोटोत तैमूरचा स्टायलिश रुप बघायला मिळाले. पाहुयात तैमूरचे 11 PHOTOS... 
बातम्या आणखी आहेत...