आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्त उंची ठरली पूजा-सुश्मितासाठी करिअरमध्ये अडथळा, FLOP ठरले फिल्मी करिअर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः  सुश्मिता सेनला मिस युनिव्हर्सचा किताब आपल्या नावी करुन 23 वर्षांचा काळ लोटला आहे. 1994 साली तिने हा सन्मान आपल्या नावी केला होता. सुश्मिताची गणना इंडस्ट्रीतील उंच अभिनेत्रींमध्ये होते. खरं तर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी लूक्ससोबतच चांगली हाइट आणि पर्सनॅलिटीसुद्धा महत्त्वाची असते. सध्याच्या काळातील बी टाऊनमधील जास्तीत जास्त अभिनेत्री या ब-याच उंच आहेत. यामध्ये दीपिका पदुकोण, सोनम कपूर, कतरिना कैफ, सोनाक्षी सिन्हा, अनुष्का शर्मा या अभिनेत्रींचा समावेश आहे. मात्र पण 1990-2000 याकाळात उंचीच काही अभिनेत्रींच्या करिअरसाठी अडथळा ठरली होती. या काळात इंडस्ट्रीत आलेल्या उंच अभिनेत्रींना भरपूर काम मिळाले नाही. कारण त्यांचे को-स्टार्स (हीरो) त्यांच्यापेक्षा ठेंगणे होते. त्यामुळे उंच अभिनेत्री आणि ठेंगणा हीरो असलेल्या जोडीला निर्माते-दिग्दर्शक आपल्या सिनेमात घेत नव्हते.
 
उंची ठरली सुश्मिताच्या करिअरमध्ये अडथळा...

सुष्मिता सेन
उंचीः 5 फूट 9 इंच

मिस युनिव्हर्सचा खिताब आपल्या नावी करणा-या सुश्मिताने एका मुलाखतीत सांगितले होते, की 'मैंने प्यार क्यों किया' या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सलमान खान (5.7) सोबत काम करताना तिला आपल्या जास्त उंचीमुळे बरीच अडचण आली होती. जास्त उंचीमुळेच सुश्मिताच्या खात्यात निवडक सिनेमे जमा आहेत.
 
पूजा बत्रा
उंचीः 5 फूट 10 इंच

पूजा बत्राची उंची 5 फूट 10 इंच आहे. तिने हिंदीसह तेलगू आणि मल्याळम सिनेमांमध्येही काम केले आहे. बॉलिवूडमध्ये जवळजवळ 20 सिनेमांमध्ये झळकलेल्या पूजाला येथे हवे तसे यश मिळाले नाही. 'हसीना मान जाएगी', 'कही प्यार ना हो जाए' हे तिचे यशस्वी सिनेमे आहेत. यामध्ये संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ हे तिचे हीरो होते. मल्टीस्टारर सिनेमांमध्ये झळकलेली पूजा आता फिल्मी दुनियेतून जणू गायबच झाली आहे. पूजा बत्राने एका मुलाखतीत सांगितले होते, की जास्त हाइट असल्यामुळे हीरो तिच्यासोबत काम करण्यास नकार देत होते.
 
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या आणखी कोणत्या अभिनेत्रींच्या करिअरमध्ये अधिक उंची ठरली अडथळा...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...