आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आठवीत शिकणा-या या मुलाने केलंय सलमानसोबत काम, कुस्तीत आहे चॅम्पिअन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमान खानच्या सुल्तान सिनेमात इंदोरच्या कुबेरने केले आहे काम - Divya Marathi
सलमान खानच्या सुल्तान सिनेमात इंदोरच्या कुबेरने केले आहे काम
इंदोर : मंगळवारी (12 एप्रिल) सलमान खानच्या 'सुल्तान' सिनेमाचा टीझर रिलीज झाला आहे. सिनेमात इंदोरच्या आठवीत शिकत असलेल्या कुबेरने अभिनय केला आहे. नॅशनल स्कूल कॉम्पिटीशनमध्ये कांस्य पदक जिंकणा-या कुबेरला कुस्तीचे डावपेच वारसा म्हणून लाभले
आहे.
कशी मिळाली कुबेरला सलमानसोबत काम करण्याची संधी....
- कुबेरला सिनेमात काम करण्याची संधी कुस्तीमध्ये कॉमनवेल्थ मेडल विजेता इंदोरचे पहिलवान कृपाशंकर पटेल यांनी दिली.
- सुल्तान सिनेमात सलमान खान कुस्तीचा प्रशिक्षक आहे. तो मुलांना कुस्ती शिकवतो. कुबेरची सिनेमात 2 मिनिटांची भूमिका आहे.
वडिलांची केली चौकशी...
कुबेरने सांगितले, की तो दिल्लीत कुस्ती खेळत होता, तेव्हा सलमान त्याला दूरुन पाहत होता. कुस्ती संपल्यानंतर त्याने माझे वडील आणि आजोबांविषयी विचारले. माझी सिनेमात दोन मिनिटांची भूमिका आहे.
वयाच्या 6व्या वर्षीपासून शिकतोय कुस्ती...
- वयाच्या सहाव्या वर्षीच कुस्तीचे डावपेच दाखवणारा कुबेर ठाकुरला हे कौशल्य वारसा म्हणून लाभले आहेत. त्याच्या पणजोबांनी 1932मध्ये पाटणीपूरा क्षेत्रात चंद्रपाल उस्ताद व्यायामशाळेचा पाया रोवला होता. या आखाड्याच्या मातीत त्यांच्या पाचवी पिढीनेसुध्दा ही कला जोपसली.
दोन वर्षे मप्र कुस्ती सम्राट, नॅशनल स्पर्धेत कांस्य पदक जिंकेल...
आठवीचा विद्यार्थी कुबेरने अलीकडेच राष्ट्रीय शालेय कुस्तीत कांस्य पदक जिंकले आहे. त्याने 2015 मध्ये मप्र चॅम्पियनचा किताब जिंकला आहे. 2012 आणि 2013मध्ये त्याला मप्र कुस्ती सम्राटचा किताब मिळाला होता.
मातीत खेळण्याची आवड...
आजची मुले मोबाईल आणि कम्प्यूटर गेम्समध्ये व्यस्त दिसतात. त्यामुळे शारीरिक खेळांपासून दूरावा निर्माण झाला आहे. मात्र, कुबेरने आखाड्याच्या मातीत खेळून वेगळे ओळख निर्माण केली आहे. तो रोज सकाळी 4 वाजता उठतो.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा कुबेरचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...