आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking: इतके दु:खद होते जिया खानचे आयुष्य, जाणून घ्या काही Facts

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिवंगत अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्या प्रकरणात सीबीआयच्या चार्जशीटमध्ये नवे खुलासे होत आहेत. सीबीयआय चार्जशीटनुसार, जिया मृत्यूपूर्वी गर्भवती होती आणि तिचा गर्भपात करण्यात आला होता. बॉयफ्रेंड सूरज पांचोलीने जियाचा घरीच गर्भपात केल्याचेसुध्दा सीबीआयच्या चार्जशीटमध्ये नमूद आहे. नुकतीच एक बातमी समोर आली आहे, की जियाच्या मृत्यूच्या रात्री सूरजने तिला काही मेसेज पाठवले होते. यावरून स्पष्ट दिसते, की त्यांचे जोरदार भांडण झाले होते.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार सीबीआय चार्जशीटमध्ये जिया उर्फ नफिसा रिझवी हिच्या पत्राचा उल्लेख आहे.

त्यात लिहिले होते की, ‘तुमने वादा किया था की, हमारे रिश्ते को एक साल होते ही हम सगाई कर लेंगे। मैं प्रेग्नेंट होने से डरती थी। मुझे हमारे बच्चे का अबॉर्शन कराना पडा।’ सीबीआयच्या मते या नोटवरून हे स्पष्ट होते की, आरोपी सूरजने जियाला खोटे वचन दिले होते. त्यामुळेच जिया आत्महत्या करण्यास प्रवृत्त झाली.

सीबीआय रिपोर्टनुसार, जिया चार महिन्यांची गर्भवती होती. याविषयी तिने बॉयफ्रेंड सुरज पांचोलीला सांगितले होते. त्यानंतर दोघांनी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी काही मेडिकल कॉम्प्लिकेशन्स आल्या होत्या. तेव्हा सूरजने स्वत: हे भ्रूण काढून टॉयलेटमध्ये फेकले होते. या घटनेनंतर सूरज जियापासून दूर राहत होता. याचा जियाला मानसिक धक्का बसला होता.

सूरजमुळे जिया तणावाखाली जगत होती, तिला त्याचे दुर्लक्ष करणे आवडले नाही आणि तिने आत्महत्या केली. जियाने सूरजला लिहिलेले शेवटचे पत्रसुध्दा मागील काही दिवसांपूर्वी समोर आले होते. त्यामध्ये जियाने लिहिले होते, 'माझ्यासोबत चुकीचे झाले आहे. मला माहित नाही देवाने आपल्याला का भेटवले. मी खूप त्रास सहन केला, त्यासाठी मी डिझर्व्ह करत नाही.'
जिया तशी मनमिळाऊ आणि हस-या चेह-याची तरुणी होती. मात्र प्रेमातील अपयशाने तिला खचून टाकले होते. ती मनातल्या मनात जगायला लागली होती. जियाला तिची घूसमट सहन न झाल्याने तिने स्वत:ला संपवले. जियाविषयी अनेक रंजक गोष्टी आहेत, ज्या क्वचितच लोकांच्या समोर आल्या आहेत. आम्ही आज या पॅकेजच्या माध्यमातून तुम्हाला जियाच्या खासगी आयुष्यातील काही गोष्टी सांगत आहोत...
जिया खानच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...