आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Pataudi Palace Od Saif Ali Khan And Kareena Kapoor

हा आहे सैफ-करीनाचा शाही महल, छायाचित्रांतून पाहा खास झलक...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पतौडी पॅलेसचे स्विमिंग पूल
भोपाळ- 21 सप्टेंबरला बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूरचा जन्म झाला. सोबतच टायगर पतौडी नावाने ओळखले जाणारे प्रसिध्द पतौडीचे नववे नवाब आणि भारतीय क्रिकेट टीमचे माजी कर्णधार मन्सूर अली खाँ पतौडी यांची 22 सप्टेंबरला पुण्यतिथी आहे. चार वर्षांपूर्वी फुफ्फुसात संसर्ग झाल्याने दिल्ली येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नवीब पतौडी यांचे कुटुंबीय अनेक वर्षे भोपाळमध्ये राहिले. त्यांचा आणि सैफ अली खानचा जन्मसुध्दा भोपाळमध्येच झाला. त्यांचे वडिलोपार्जित घर पतौडी पॅलेस आहे. त्याला इब्राहिम कोठी नावाने ओळखले जाते. हा शाही महल ब्रिटीश आर्किटेक्चरचा एक शानदार नमुना आहे.
पतौडी ची आई साजिदा सुल्तान भोपाळ नवाबी यांची मुलगी होती. लग्नानंतरसुध्दा पत्नी शर्मिली आणि मुलगा सैफसोबत ते काही वर्षे भोपाळमध्येच राहिले. divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे शाही पतौडी पॅलेसशी निगडीत काही खास गोष्टी...
पतौडी पॅलेस बनवण्यात भोपाळ नवाबने केली होती मदत-
नवाह पतौडीची आई साजिदा सुल्तान भोपाळचा शेवटचा नवाब हमीदुल्ला खाँची मुलगी होती. इतिहासकार सैयद अख्तर हुसैन यांच्या सांगण्यानुसार, त्यांचे लग्न इफ्तियार अली खान पतौडीसोबत झाले होते. परंतु साजिदा सुल्तानने पतौडीमध्ये राहण्यासाठी नकार दिला होता, कारण पतौडी च्या नवाबचा कोणताच शाही महल नव्हता. साजिदा नेहमी भोपाळमध्येच राहत होत्या. पत्नीच्या हट्टामुळे इफ्तियार अली पतौडी पॅलेस बनवले होते. भोपाळ नवाबनेसुध्दा इफ्तियार अली पतौडी यांची मदत केली होती. या पॅलेजमध्ये आज बॉलिवूड सिनेमांच शूटिंग होते. ब्रिटीश आर्किटेक्चर स्टाइलमध्ये बनलेला हा महलात अनेक वर्षे हॉटेल चालू होते. आता सैफ आणि करीना याला पुन्हा डिझाइन करत आहेत.
हा शानदार पॅलेस गुडगांवपासून 26 किलोमीटर दूर असून दिल्लीतील आयजीआय इंटरनॅशनल एअरपोर्टपासून 100 किमी. दूर अंतरावर आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा शाही पतौडी पॅलेजची खास छायाचित्रे...