आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉरिडोर ते लिव्हिंग-डाइनिंग रूमपर्यंत, Photos मधून पाहा, अक्षय-ऋतिकचे घर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गार्डनमध्ये अक्षय आणि ट्विंकल. - Divya Marathi
गार्डनमध्ये अक्षय आणि ट्विंकल.
मुंबई: अक्षय कुमारचा बहू चर्चित चित्रपट 'रुस्तम' चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 12 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटांला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या चित्रपटाने सुरुवातीच्या दोन दिवसांत 30.54 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
या भव्य डुप्लेक्सचा मालक आहे अक्षय...
अक्षय पत्नी ट्विंकल आणि आरव व नितारा या दोन मुलांसह अंधेरी वेस्टच्या लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये राहतो. त्याचे हे भव्यदिव्य डुप्लेक्स जुहू बीच समोर बांधण्यात आले आहे. या बंगल्याचे इंटीरियर खुद्द त्याच्या पत्नीने म्हणजे ट्विंकल खन्नाने केले आहे. ग्राउंड फ्लोरवर लिव्हिंग एरिया, डायनिंग एरिया, किचन, होम थिएटर आणि अक्षय कुमारचे क्लोजेट आहे. तर, फर्स्ट फ्लोरवर बेडरूम, पँट्री, ट्विंकल खन्नाचे ऑफिस आणि बालकनी तयार करण्यात आली आहे. याच बालकनीमध्ये अक्षय त्याच्या मुलांसह आणि पत्नीसह लूडो आणि इतर काही इंडोर गेम्स खेळतो...
याच इमारतीत राहतो ऋतिक
अक्षय कुमार आणि ऋतिक रोशन शेजारी आहेत. जुहू येथे असलेल्या या सी-फेसिंग इमारतीतच या दोघांचेही घर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अक्षय या इमारतीत राहतो. तर ऋतिक गेल्या वर्षीच या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहण्यासाठी आला आहे. ऋतिक आणि अक्षय हे चांगले मित्र आहेत. एवढेच नाही तर फिल्म प्रोड्यूसर साजिद नाडियाडवालादेखील याच इमारतीत राहतात.

पुढाल स्लाइड्सवर पाहा, अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्नाच्या या भव्यदिव्य घराचे INSIDE PHOTOS.... आणि सोबतच ऋतिकच्याही घराचे इंटिरियर..
सर्व फोटोज- कासा वोग
बातम्या आणखी आहेत...