आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • The Twist And Turns In Shahrukh Khan Gauri Love Story

फिल्मी आहे शाहरुख-गौरीची लव्ह स्टोरी, दोनदा अडकले लग्नगाठीत, पाहा Wedding Album

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः संगीत सेरेमनीत शाहरुख-गौरी - Divya Marathi
फाइल फोटोः संगीत सेरेमनीत शाहरुख-गौरी

मुंबईः बॉलिवूडचा किंग अर्थातच अभिनेता शाहरुख खानने वयाची 50 वर्षे पूर्ण केली आहेत. 2 नोव्हेंबर 1965 रोजी जन्मलेल्या शाहरुखच्या यशामागे त्याची पत्नी गौरी खानचा मोठा वाटा आहे. अनेकदा शाहरुखने हे बोलूनदेखील दाखवले आहे. अलीकडेच आपल्या लग्नाचा त्यांनी 24 वा वाढदिवस साजरा केला. या दोघांची लव्ह स्टोरी एखाद्या फिल्मी कहाणीपेक्षा वेगळी नाहीये. वेगवेगळ्या धर्माचे असलेल्या शाहरुख-गौरीने केवळ एकमेकांचा स्वीकारच केला नाही, तर हे दोघे आज बॉलिवूडमधील आदर्श जोडप्यांपैकी एक आहेत.
पहिल्या नजरेतील प्रेम...
शाहरुख खान आणि गौरीची भेट शालेय जीवनात एका पार्टीत झाली होती. त्या पार्टीत शाहरुखने गौरीला एका मुलासोबत डान्स करताना पाहिले होते. तिला पाहताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला. शाहरुखचे लव्ह अॅट फस्ट साइट होते. शाहरुख-गौरीची पहिली भेट झाली तेव्हा तो 19 वर्षांचा तर गौरी 14 वर्षांची होती. शाहरुखने पार्टीत गौरीसोबत बोलण्याचा प्रयत्न केला होता, मात्र गौरीने त्याच्यासोबत बोलणे टाळले. 25 ऑक्टोबर 1984 रोजी झालेल्या तिस-या भेटीत शाहरुखने गौरीच्या घरचा फोन नंबर मिळवला. सुरुवातीला गौरीला इम्प्रेस करण्यासाठी शाहरुख तिच्यासाठी गाणे म्हणायचा. त्या गाण्याचे बोल होते, "गोरी तेरा गांव बड़ा प्यारा मैं तो गया मारा....". किंग ऑफ रोमान्सने हार न मानता गौरीला आपल्या प्रेमात पाडले आणि त्यांचे अफेअर सुरु झाले.
कोडवर्डमध्ये व्हायचे बोलणे
शाहरुख पहिल्याच नजरेत गौरीच्या प्रेमात पडला होता. तिच्याशी फोनवर बोलण्यासाठी शाहरुखने एक उपाय शोधून काढला. तो आपल्या एखाद्या मैत्रिणीला गौरीच्या घरी फोन करायला सांगायचा. गौरीच्या घरी जो कुणी फोन उचालयाच, त्याला ती मैत्रीण आपले नाव शाहीन सांगायची. शाहीन हा कोडवर्ड ऐकून शाहरुखचा फोन असल्याचे गौरीला समजायचे. गौरीच्या घरी कुणाला शंका यायची नाही आणि बराच वेळ या दोघांचे बोलणे व्हायचे. गौरी आणि शाहरुखची भेट पार्टीजमध्ये अधिक व्हायची. हळूहळू हे दोघे लाँग ड्राइव्हवर जाऊ लागले.
कसे केले होते शाहरुखने गौरीला प्रपोज?
मुश्ताक शेख लिखीत शाहरुख केन या बायोग्राफीत शाहरुखने आपल्या जुन्या दिवसांच्या आठवणींना उजाळा देत सांगितले होते, "एकेदिवशी मी गौरीला सोडायला तिच्या घरी गेलो होतो. गौरी गाडीवरुन उतरल्यानंतर मला तुझ्याशी लग्न करायचे आहे, असे मी तिला म्हटले आणि तिचे उत्तर न ऐकताच तिथून निघून गेले होतो."
पजेसिव्ह शाहरुखला कंटाळली होती गौरी
शाहरुख गौरीविषयी खूपच पजेझिव्ह होता. जर गौरीने आपले केस जरी मोकळे ठेवले तरीदेखील तो तिच्याशी भांडायचा. शाहरुखच्या या सवयीला कंटाळून एकेदिवशी गौरी कुणालाही न सांगता दिल्लीहून मुंबईत आली होती. शाहरुख गौरीची समजूत घालण्यासाठी तिच्या शोधात मुंबईत आला. मात्र मुंबईत गौरी कुठे आहे, हे त्याला ठाऊक नव्हते, पण त्याने अनेक दिवस तिचा शोध घेतला. एकेदिवशी मुंबईतील अक्सा बीचवर शाहरुखला गौरी भेटली. त्याला बघताच तिला रडू कोसळले होते.
दोनदा झाले लग्न
शाहरुख आणि गौरी आपल्या नात्याचे रुपांतर लग्नात करु इच्छित होते, मात्र दोघेही वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे गौरीच्या कुटुंबाचा या लग्नाला विरोध होता. गौरीच्या कुटुंबीयांची समजूत घालताना शाहरुखच्या नाकी नऊ आले होते. अखेर त्याने गौरीच्या कुटुंबीयांचा होकार मिळवण्यात यश मिळवले. 26 ऑगस्ट 1991 रोजी शाहरुख आणि गौरीचे कोर्टात लग्न झाले. दोघांचा निकाहसुद्धा झाला. यावेळी गौरीचे नाव आयशा ठेवण्यात आले होते. त्यानंतर 25 ऑक्टोबर 1991 रोजी हिंदू पद्धतीने दोघे विवाहबद्ध झाले. लग्नाच्या संगीत कार्यक्रमात या दोघांनी एकत्र डान्सदेखील केला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, शाहरुख-गौरीचे Wedding Photos...