आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'हम साथ साथ है'मधील ही चिमुकली आता झाली आहे 23 वर्षांची, बिकिनीत अवतरली रुपेरी पडद्यावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
'हम साथ साथ है' या गाजलेल्या सिनेमाला नुकतीच 18 वर्षे पूर्ण झाली आहेत. 5 नोव्हेंबर 1999 रोजी रिलीज झालेला हा सिनेमा त्यावर्षातील सुपरहिट ठरलेल्या सिनेमांपैकी एक होता. सूरज बडजात्या दिग्दर्शित कौटुंबीक धाटणीच्या या सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. एवढ्या वर्षांत सिनेमातील सर्वच स्टार कास्टच्या लूकमध्ये वयानुसार बदल घडला आहे. यामध्ये झळकलेली एक चिमुकलीसुद्धा आता मोठी झाली आहे. आम्ही बोलतोय ते जोया अफरोजविषयी. चित्रपटात अभिनेत्री नीलमच्या मुलीची भूमिका वठवलेली जोया आता 23 वर्षांची झाली आहे. चित्रपटात ती केवळ पाच वर्षांची होती. 10 जानेवारी 1994 रोजी लखनऊ येथे तिचा जन्म झाला. तारुण्यात पदार्पण केल्यानंतर जोयाचा लूकदेखील ग्लॅमरस झाला आहे. 
 
लीड अॅक्ट्रेस म्हणून बॉलिवूडमध्ये झाली आहे एन्ट्री...  
हिमेश रेशमिया स्टारर 'द एक्सपोज' या सिनेमात जोयाने हीरोईन म्हणून काम केले आहे. या सिनेमात सोनाली राऊत तिच्यासोबत होती. याशिवाय वयाच्या 18 व्या वर्षी म्हणजे 2013 मध्ये  जोयाने पाँड्स फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल अवॉर्ड आपल्या नावी केला आहे. 
 
बालपणापासून अभिनयक्षेत्रात...
जोया पहिल्यांदा रसनाच्या जाहिरातीत झळकली होती. तिने बालपणी व्हर्लपूल, शॉपर्स स्टॉप, जेट एअरवेज, ओरिएंट पीएसपीओ या कंपनीसाठी जाहिरात केली आहे. जोया हिंदीसोबतच पंजाबी सिनेसृष्टीतही कार्यरत आहे. 'स्वीटी वेड्स एनआरआय' हा जोयाचा चित्रपट यावर्षी जून महिन्यात रिलीज झाला आहे. 

पुढील स्लाईड्समध्ये पाहा, जोयाचा थक्क करणारा ग्लॅमरस लूक... 
 
बातम्या आणखी आहेत...