आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: लाइमलाइटपासून दूर राहते 'वास्तव' गर्ल, आता दिसतेय अशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नम्रता शिरोडकर - Divya Marathi
नम्रता शिरोडकर
मुंबई: 'दे धक्का' या मराठी सिनेमाच्या रिमेकवर अभिनेता संजय दत्तसोबत काम करत असलेल्या निर्माता महेश मांजरेकर यांनी सांगितले, की या नवीन सिनेमासह दोघे 'वास्तव'च्या आठवणी ताज्या करणार आहेत. 1999मध्ये आलेल्या 'वास्तव' सिनेमात संजयने अंडरवर्ल्ड डॉन रघुची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. सिनेमात त्याच्या लव्हलेडीची भूमिका नम्रता शिरोडकरने वठवली होती. 44 वर्षीय नम्रता शिरोडकर सध्या लाइमलाइटपासून खूप दूर आहे.
मिस इंडिया बनल्यानंतर सिनेमांत केली एंट्री...
मुंबईमध्ये लहानाची मोठी झालेली नम्रता 1993मध्ये चर्चेत आली होती. त्यावर्षी तिच्या डोक्यावर मिस इंडियाचे मुकुट सजले होते. ती मिस यूनिव्हर्स स्पर्धेतसुध्दा पाचव्या नंबरवर होती. ब्यूटी कॉन्सेस्ट जिंकल्यानंतर काही वर्षे मॉडेलिंग केल्यानंतर नम्रताने सिनेमाकडे मोर्चा वळवला. 1998मध्ये नम्रताने सलमान खानसोबत 'जब प्यार किसी से होता है'मधून पदार्पण केले. तिच्या यशस्वी सिनेमांमध्ये 'पुकार', 'वास्तव', 'हेरा फेरी', 'अस्तित्व', 'कच्चे धागे', 'तेरा मेरा साथ रहे', 'LOC कारगिल' सामील आहेत.
वयाने लहान आहे नम्रताचा पती...
बॉलिवूडमध्ये यश मिळाले नाही म्हणून नम्रताने दाक्षिणात्य सिनेमांत काम करण्यास सुरुवात केली. 2000मध्ये 'वामसी' या तेलगू सिनेमाच्या शूटिंगदरम्यान तिची साऊथचा सुपरस्टार महेश बाबूसोबत भेट झाली. काही वर्षे डेटींग केल्यानंतर फेब्रुवारी 2005मध्ये त्यांनी लग्न केले. महेश बाबू नम्रतापेक्षा वयाने 3.5 वर्षे लहान आहे. महेश-नम्रता मुलगा गौतम आणि मुलगी सितारा यांचे आई-वडील आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉलिवूडच्या झगमगाट जगापासून दूर राहणा-या नम्रताचे लेटेस्ट फोटो... या फोटोंमध्ये दिसते, की गेल्या काही वर्षांत तिच्या किती बदल झाला आहे...
बातम्या आणखी आहेत...