आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या अॅक्ट्रेसला दिला होता शत्रुघ्न सिन्हांनी प्रेमात दगा, एवढ्या वर्षांनी आता दिसते अशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- बॉलिवूडच्या दुनियेपासून दूर अज्ञातवासात जीवन व्यतित करणारी अभिनेत्री रिना रॉय गुरुवारी एका इव्हेंटमध्ये पोहोचली. दीर्घ काळानंतर कॅमे-यासमोर आलेल्या रिना रॉयला यावेळी ओळखणे कठीण झाले. 1972 साली जरुरत या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या रिनाने नागिन, अपनापन, आशा यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. रिना पडद्यावर जेवढी लोकप्रिय ठरली तेवढीच तिच्या लव्ह लाइफचीही चर्चा झाली. रिनाची जोडी शत्रुघ्न सिन्हांसोबत कालीचरण (1976), चोर हो तो ऐसा (1978), हीरा मोती (1979), माटी मांगे खून (1984) या सिनेमांमध्ये जमली. यावेळी दोघांच्या ऑन स्क्रिनच नव्हे तर ऑफ स्क्रिन केमिस्ट्रीचीही चांगलीच चर्चा रंगली.
शत्रुघ्न यांनी 1980मध्ये माजी मिस यंग इंडिया राहिलेल्या पूनम चंडीरामणी (आता सिन्हा) यांच्याशी लग्न केले. याच काळात शत्रुघ्न यांचे नाव अभिनेत्री रिना रॉयसोबत जुळले होते. एका मुलाखतीत त्यांनी सांगितले होते, की रिनासोबत त्यांचे नाते 7 वर्षे होते. विशेष म्हणजे, शत्रुघ्न यांची पत्नी पूनम यांना या अफेअरविषयी सर्वकाही ठाऊक होते.

शत्रुघ्न यांच्या लग्नाने अचंबित झाल्या होत्या रिना
बॉलिवूडमध्ये रिना यशोशिखरावर होत्या, त्यावेळी त्यांचे अफेअर शत्रुघ्न सिन्हा यांच्यासोबत होते. काही कामानिमित्त रिना लंडन गेल्या होत्या. त्यावेळी शत्रुघ्न यांनी पूनमसोबत लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्काच दिला होता. रिना यांना या लग्नाविषयी माहित झाल्यानंतर त्या भडकल्या आणि भारतात येऊन याचे उत्तर मागितले. लग्नाच्या अनेक वर्षांनंतरसुध्दा शत्रुघ्न रिना यांना भेटत होते. परंतु या नात्याचा दु:खद अंत झाला. दोघांचे नाते का संपुष्टात आले, याचे उत्तर आजही कुणाकडे नाहीये.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, शत्रुघ्न सिन्हा आणि रिना रॉय यांची लव्ह-स्टोरी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...