मुंबई: या आठवड्यात रिलीज होणारा शाहरुख खान स्टारर आणि मनीष शर्मा दिग्दर्शित 'फॅन' रिलीजपूर्वीच वादात अडकला आहे. हा सिनेमा 1996मध्ये आलेल्या 'द फॅन' या हॉलिवूड सिनेमाची कॉपी असल्याचे म्हटले जात आहे. या हॉलिवूड सिनेमात रॉबर्ट डी नीरो आणि वेस्ली स्नाइप्स मुख्य भूमिकेत होते. फरक केवळ इतकाच आहे, की त्या सिनेमात दोन विविध पात्र होते आणि शाहरुखच्या सिनेमात तो एकटाच दोन्ही भूमिका साकारत आहे.
दोन्ही सिनेमांचे ट्रेलरसुध्दा एकसारखेच...
दिग्दर्शक टोनी स्कॉट 'द फॅन' एक स्पोर्ट्स स्टार आणि त्याच्या चाहत्याची कहाणी होती. तसेच, शाहरुखचा 'फॅन' एक सिनेस्टार आणि त्याच्या चाहत्यासाठी आहे. दोन्ही सिनेमांचे ट्रेलर काही प्रमाणात सारखेच आहे. मात्र, हॉलिवूड 'द फॅन' सिनेमाची जास्त प्रशंसा झाली नव्हती आणि त्याला जास्त प्रतिसादसुध्दा मिळाला नव्हता. याचा फायदा शाहरुखच्या सिनेमाला मिळू शकतो. परंतु दोन्ही सिनेमांमध्ये अनेक साम्य आहेत. आता शाहरुखच्या 'फॅन'ला त्याचे फॅन किती पसंत करतात, हे पाहणे रंजक ठरेल.
असे पहिल्यांदाच होत नाहीये, की शाहरुखचा एखादा सिनेमा हॉलिवूड सिनेमांना कॉपी करतोय. 'फॅन'पूर्वी त्याने अनेक सिनेमे आलेत, जे कोणत्या ना कोणत्या सिनेमांचे कॉपी आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या शाहरुख खानच्या हॉलिवूडशी प्रेरित आणि कॉपी असलेल्या सिनेमांविषयी...