आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Drug Addict: काहींचे करिअर झाले उध्वस्त, काही मृत्यूच्या दारातून आले परत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मनीषा कोयराला आणि राहुल महाजन - Divya Marathi
मनीषा कोयराला आणि राहुल महाजन
दिग्दर्शक अभिषेक चौबेच्या 'उडता पंजाब' सिनेमात तरुणांमध्ये वाढत असलेल्या व्यसनाचे चित्र दाखवले आहे. हा सिनेमा सध्या वादात अडकला आहे. मात्र, या सिनेमाला मुंबई हायकोर्टने रिलीजची मंजूरी दिली आहे. सिनेमात शाहिद कपूर ड्रग अॅडिक्ट पॉप सिंगर असून आलिया भट ड्रग अॅडिक्टच्या भूमिकेत दिसते. हे झाले सिनेमाविषयी, परंतु जर वास्तवाविषयी बोलायचे झाले तर अनेक सेलेब्स आहेत, जे ड्रग्सच्या आहारी गेले आहेत.
राहुल महाजन...
दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा आणि अभिनेता राहुल महाजनसुध्दा एकेकाळी ड्रग्च्या आधीन गेला होता. वडिलांच्या निधनानंतर महिन्याभराने म्हणजे 3 जून 2006 रोजी राहुल महाजनला कोकिनच्या ओव्हरडोजमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी राहुलने दिलेल्या माहितीनुसार, ड्रिंकसोबत त्याने ड्रग्सचा ओव्हरडोज घेतला होता. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर राहुलला ड्रग्स घेतल्याच्या आरोपात अटक झाली होती.
मनीषा कोयराला...
यशोशिखरावर असताना मनीषा कोयराला ड्रग्स आणि दारूच्या नशेत बुडाली होती. त्यामुळे तिला कॅन्सर झाला होता. कॅन्सरवर उपचार करण्यासाठी तिला दारू आणि ड्रगचे व्यसन सोडावे लागले. आता मनीषा ठणठणीत झाली आहे. मध्यंतरी ती आध्यत्माशी जुळली होती. दारू आणि ड्रग्सने तिचे करिअर उध्वस्त झाले होते. लवकरच ती 'Oru Melliya Kodu' या तामिळ सिनेमातून कमबॅक करणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या ड्रग्सच्या व्यसनात बुडालेल्या सेलेब्सविषयी...
बातम्या आणखी आहेत...