आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दारूशिवाय पूर्ण होत नसे RK Studio च्या पार्टीज्, असा असायचा आतील नजारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  शनिवारी चंबूर येथील आरके स्टुडिओला आग लागली. या आगीने वित्तहानी झाली पण सुदैवाने जीवीतहानी टळली. 1948 साली स्थापन केलेल्या या स्टुडिओमध्ये अनेक शूटिंग झाल्या आहेत.  खासकरुन आरके बॅनरखाली बनलेल्या चित्रपटांचे शूटिंग येथे होत असे. येथे होणाऱ्या पार्टींची लोक आजही आठवण काढतात. विशेष म्हणजे या पार्टीत आल्यावर दारु पिणे अनिवार्य असे. स्टुडिओत होणारी होळीची सर्वच जण प्रतिक्षा करत असत. आज आरके स्टुडिओमधील अशाच काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत. कधीच न विसरता येणारी होळी...
 
आरके स्टुडिुओमध्ये होणारी होळी सर्वात प्रसिद्ध असे. राज कपूर यांनी 60 च्या दशकात होळी आणि गणेशोत्सव हे मोठे उत्सव सुरु केले होते. गणेशोत्सव अजूनही चालु आहे पण राज कपूर यांच्या मृत्यूनंतर होळीचे आयोजन बंद करण्यात आले. या होळीमध्ये सिनेजगतातील लहानमोठे सर्व कलाकार सहभागी होत असत. अमिताभ बच्चनपासून शत्रुघ्न सिन्हा, जीनत अमान, राजेंद्र कुमार, नरगिस, सितारा देवी, शंकर-जयकिशन यांसारखे अनेक कलाकार उपस्थिती लावत असत. 

पुढच्या स्लाईडवर वाचा, आरके स्टुडिओच्या अजून काही खास आठवणी..
बातम्या आणखी आहेत...