आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • These Hilarious Remarks By Bollywood Actors At Twinkle Khanna\'s Book Launch Will Drive You Nuts!

करण जोहर म्हणाला, \'टि्ंवकल खन्नावर माझे एकतर्फी प्रेम होते...\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(टि्ंवकल खन्नासोबत निर्माता करण जोहर आणि आमिर खान)

 
मुंबई- अभिनेत्री टि्ंवकल खन्नाने मंगळवारी (18 ऑगस्ट) \'मिसेज फनीबोन्स\' नावाच्या पुस्तकाचे प्रकाशन केले. बुक लाँचिंगवेळी निर्माता करण जोहर, आमिर खान, अक्षय कुमार, डिंपल कपाडिया, जया बच्चन, सोनाली बेंद्रेसह अनेक स्टार्स उपस्थित होते. 
 
जेव्हा इव्हेंटमध्ये होस्ट करण जोहरसमोर टि्ंवकल खन्ना, अक्षय कुमार आणि आमिर खानसारखे स्टार्स बसलेले होते, या चारही स्टार्सनी एकमेकांच्या पोलखोल केली. चला एक नजर टाकूया निर्माता करण जोहर, टि्ंवकल खन्ना, अक्षय कुमार आणि आमिर खानच्या Candid Confessionsवर... 
 
आमिर खान- लोकांचा अपमान करण्यात टि्ंवकल खन्ना पटाईत आहे. ती सतत माझा अपमान करत असते. इतकेच काय, तिने तिच्या लग्नात मला व्हिडिओग्राफर बनवले होते. 
 
टि्ंवकल खन्ना- एका सिनेमादरम्यान, आमिर दिग्दर्शकासोबत एका शॉटवर चर्चा करत होता. परंतु दिग्दर्शकाने त्याचे ऐकले नाही. त्यानंतर आमिर एका मोठ्या खडकामागे जाऊन रडायला लागला होता. 
 
करण जोहर- टि्ंवकल खन्ना एकमेव अशी महिला आहे, जिच्यावर मला प्रेम झाले होते. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात केवळ तिच्यावरच प्रेम केले. 
 
करण जोहर- आमिर खानमुळे टि्ंवकलचे लग्न अक्षयसोबत झाले. टि्ंवकलने सांगितले होते, की जर \'मेला\' (आमिर आणि टि्ंवकलचा सिनेमा) फ्लॉप झाला तर ती अक्षयसोबत लग्न करेल. 
 
टि्ंवकल खन्ना- मला अभिनय येत नाही. चांगले झाले मी अभिनय करणे सोडले. 
 
अक्षय कुमार- मी माझ्या पत्नीसोबत खूप भांडतो. मात्र नंतर सर्व प्रकरण मलाच सांभाळावे लागले. आमच्या घरात काही नियम आहेत. नियम नंबर 1- मिसेज फनीबोन्स (टि्ंवकल) नेहमी बरोबर आहे. घरातील प्रमुख व्यक्तीला (अक्षय) नेहमी माफी मागावी लागते. 
  
टि्ंवकल खन्ना- अक्षयसोबत लग्न करण्यापूर्वी मी त्याच्या कुटुंबीयांची चौकशी केली होती. मला जाणून घ्यायचे होते, की कुणाला काही गंभीर आजार तर नाहीये ना. अक्षयच्या काकांना कोणत्या वयात टक्कल पडत होते याचीदेखील मी चौकशी केली होती. 
 
अक्षय कुमार- जर मला टि्ंवकलला माझ्या एखाद्या सिनेमाच्या टायटलने संबोधित करायचे असेल तर मी तिला \'बेबी\' (अक्षयचा सिनेमा) म्हणेल. तो एका हॅपी एंडिंगसह डेडली मिशनवर असतो. 
 
बुक लाँचिंग इव्हेंटमध्ये करण जोहरने टि्ंवकल खन्नासोबत \'कॉफी विथ करण\' शो केला. त्यावेळी करणने पटपट विचारलेले काही प्रश्न आणि त्यावरील टि्ंवकलचे दिलेले झटपट उत्तरे...जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...