आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरस्काराच्या स्पर्धेत अव्वल असलेले हे सिंगर्स मागील 2 वर्षांपासून आहे अज्ञातवासात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- हर्षदीप कौर)
मुंबई- बॉलिवूडमधील प्रसिध्द कलाकार कधी गायब होतात, कुणालाही माहित होत नाही. गेल्या वर्षीपर्यंत म्यूजिक वर्ल्डमध्ये नाव कामवणारे काही नाव आज अज्ञातवासात गेले आहेत. उदित नारायण यांचा मुलगी आदित्य नारायण संगीत क्षेत्रात नाव कमावण्यात अपयशी ठरलेल्या गायकांपैकी एक आहे. शिवाय अनेक असे अनेक नावे आहेत, जे आज अज्ञातवासात आहेत. यामधील 10 असे आहेत जे पुरस्काराच्या स्पर्धेत अव्वल होते.
प्रसिध्द दाक्षणात्य गायिका सुजाता मोहन यांची मुलगी श्वेताने दक्षिणात्याकडे कल दाखवला आहे. 'गुरु'नंतर 'रा-वन' आणि 'डेव्हिड'मधून तिने ओळक निर्माण केली होती. परंतु श्वेता सुरुवातीचे यश आणि फिल्मी बॅकराऊंड असूनदेखील बॉलिवूडमध्ये स्वत:ला स्थापित करू शकली नाही. आजकाल तेलगु आणि मळ्याळम सिनेमांमध्ये गाणे गात आहे. फेब्रुवारीमध्ये तिने एका तेलगु सिनेमाचे गाणे रेकॉर्ड केले.
'"काय पो चे'च्या "मीठी बोलियां...'मधून चर्चेत आलेली मिली नायरसुध्दा यानंतर बॉलिवूडमध्ये कमाल दाखवू शकली नाही. ती अचानक अज्ञातवासात गेली. संगीतकार घराण्याचा वारसा लाभलेला तोषी शारिबसुध्दा 2013मध्ये 'यमला पगला दिवाना-2' आणि 'वार्निंग'नंतर गायन क्षेत्रातून अचानक गायब झाला. त्याने 2014मध्ये 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिय' आणि 'जिद'मध्ये आपले संगीत दिले होते. परंतु गायनापासून दूर राहिला. नेपाळी बाला आस्थाने 'खुबसुरत'च्या 'अभी तो पार्टी...'मधून बॉलिवूडमध्ये धमाकेदार एंट्री केली होती, परंतु त्यानंतर ती अचानक लाइमलाइटपासून दूर गेली.
पाच वर्षांत इंडियन आयडलमधून चर्चेत आलेला स्वरुप खानने 'पीके'मध्ये 'ठरकी छोकरो...' गाऊन यशाचा स्वाद चाखला आहे, परंतु स्वरुप अद्याप दुस-या प्रोजेक्टशी जोडलेला नाहीये. नंदिनी श्रीकर 2011मध्ये 'रा-वन'चे 'भरे नैना...', 'क्वीन'चे 'हरजाइया...'ने तिच्या पदरी अनेक पुरस्कार दिले. परंतु त्यानंतर तिला दुसरे खास काम मिळाले नाही. ती दक्षिणकडे वळण्याचा प्रयत्न करत आहे.
हर्षदीप कौर-
2011मध्ये 'रॉकस्टार'च्या 'कतिया करू...' गाण्यासाठी हर्षदीपला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. गेल्या वर्षी 'बँग बँग'च्या 'उफ...'सुध्दा चर्चेत होते. परंतु आता तिच्या खात्यात कोणताच नवीन सिनेमा नाहीये. पंजाबी म्यूझिककडे कल दाखवत आहे. मागील महिन्यात अर्थातच मार्चमध्ये हर्षदीप तिचा मित्र मनकित सिंहसोबत लग्नगाठीत अडकली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जाणून घ्या अशाच काही गायकांविषयी...