आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तब्बल 202 कोटींचे मालक आहेत बाबा राम रहीम, महागड्या कार आहेत दाराशी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डेरा सच्चा सौदाचे संस्थापक आणि रॉकस्टार नावानेही ओळखले जाणारे बाबा राम रहीम यांच्या साध्वी शोषण खटल्याचा निकाल उद्या लागणार आहे. गुरमीत राम रहीमवर लैगिक शोषणाचा आरोप लावण्यात आला आहे. आज 25 ऑगस्ट रोजी पंचकुला सीबीआय कोर्टात त्यांना हजर केले जाणार आहे. यावेळी कोर्टात राम रहीम यांचे अनेक भक्तही उपस्थित राहणार आहेत, लाखोंच्या संख्येने राम रहीम यांचे भक्त असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आला. इतकेच नव्हे तर काही भागांमध्ये शाळा-कॉलेजेसला सुट्टीही देण्यात आली आहे.  बॉलिवूडपासून ते राजकारणापर्यंत  प्रचंड भक्तगण असलेल्या राम रहीम यांचे नाते वादांशी अनेकवेळा जोडले गेले आहे. 
 
अनेक महागड्या कारचे कलेक्शन असलेल्या राम रहीम यांची तब्बल 202 कोटींची संपत्ती आहे. विदेशातही त्यांचे अनेक आश्रम आहेत. आज त्यांच्याबद्दल काही खास गोष्टींची माहिती घेऊन आलो आहोत. 2012 साली संप्रदायाच्या हंसराज चौहाण यांनी राम रहीम यांच्यावर काही भक्तांना नपुंसक बनवल्याचा आरोप लावला होता. 
 
कितीतरी कोटींमध्ये आहे बाबा राम रहीम यांच्या व्यवसाय 
बाबा राम रहीम यांची हरीयाणातील सिरसा या जागी 700 एकर शेतजमीन आहे. गगननगर, राजस्थान येथे त्यांचे 175 बेड असलेले हॉस्पीटल आहे. याशिवाय त्यांचे अनेक गॅस स्टेशन आणि मार्केट कॉम्पलेक्सही आहेत. बाबा राम रहीम यांच्या बिझनेसच्या अनेक शाखा परसलेल्या आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, बाबा राम रहीम यांची संपत्ती 202 कोटी इतकी आहे.  जगभरात कॉन्सर्टद्वारेही त्यांची फार कमाई होते. त्यांचे विदेशातही अनेक बिझनेस आहेत. 
 
महागड्या कारचा आहे शौक..
बाबा राम रहीम यांना कारचा फार शौक आहे. त्यांच्याकडे अनेक मोठ्या आणि महागड्या गाड्यांचे कलेक्शन आहे. त्यांच्याकडील कारचे कलेक्शन एखाद्या मोठ्या बिझनेसमनलाही लाजवेल असे आहे. बाबा राम रहीम यांच्या सुरक्षेसाठी नेहमीच सिक्युरीटी तैनात असते. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, बाबा राम रहीम यांच्याबद्दल काही विशेष गोष्टी..
 
बातम्या आणखी आहेत...