आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या स्टार्सना केवळ एकाच सिनेमाने मिळाली ओळख, आता आहेत अज्ञातवासात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो: सौंदर्या, विवेक मुश्रान, अनु अग्रवाल, भाग्यश्री, जुगल हंसराज, झरीन खान) - Divya Marathi
(फाइल फोटो: सौंदर्या, विवेक मुश्रान, अनु अग्रवाल, भाग्यश्री, जुगल हंसराज, झरीन खान)
दाक्षिणात्य अभिनेत्री सौंदर्याचा जन्म 18 जुलै 1976 रोजी कर्नाटकमध्ये झाला होता. मात्र सौंदर्या आज आपल्यात नाहीये. 17 एप्रिल 2004 रोजी बंगळुरुजवळ एका विमान अपघातात सौंदर्याचे निधन झाले. सौंदर्याने 1992मध्ये 'गंधरवा' सिनेमातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवले. तिने कन्नडी, तेलगु, तामिळ आणि मल्याळम सिनेमांमध्येदेखील काम केले होते. ती 90च्या दशकातील आघाडीची अभिनेत्री होती. तिने 100पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केले होते.
अभिनयासोबतच तिने प्रॉडक्शनमध्येसुध्दा नशीब आजमावले. सौंदर्याला 6 दक्षिण फिल्मफेअर पुरस्कारने गौरवण्यात आले होते. तिने केवळ 'सूर्यवंशम' या एकाच हिंदी सिनेमात काम केले. या सिनेमामध्ये सौंदर्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकली होती.
असे नव्हे, की सौंदर्या एकमेव अशी अभिनेत्री आहे, जिची ओळख केवळ एका बॉलिवूड सिनेमाने केली जाते. सौंदर्यापूर्वी आणि नंतरही अनेक अभिनेत्री आणि अभिनेते झालेत ज्यांना एका सुपरहिट सिनेमात काम करून प्रसिध्दी मिळाली. मात्र त्यानंतर त्यांचे नाव बॉलिवूडमधून हळू-हळू गायब झाले. यामध्ये भूमिका चावला, भाग्यश्री, कुमार गौरव, राजीव कपूर, राहूल रॉय, अनु अग्रवाल, जिया खान, ग्रेसी सिंहसह अनेक स्टार्सचे नाव घेतले जाते.
बॉलिवूडमध्ये केवळ एका सिनेमांसाठी ओळखल्या जाणा-या स्टार्सविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...