(अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री)
मुंबईः नव्वदच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक नावाजलेली अभिनेत्री म्हणजे मीनाक्षी शेषाद्री. 'हीरो', 'दामिनी', 'घायल' यांसारख्या गाजलेल्या सिनेमांमध्ये
आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणा-या मीनाक्षीने लग्नानंतर सिनेसृष्टीला रामराम ठोकला. मात्र आता ब-याच वर्षांनी मीनाक्षी फिल्म इंडस्ट्रीत कमबॅक करणार असल्याची चर्चा आहे.
सनी देओल स्टारर 'घायल' या सिनेमाचा सिक्वेलवर काम सुरु आहे. 1996 मध्ये सुपरहिट ठरलेल्या या सिनेमाचा 'घायल वन्स अगेन' या नावाने सिक्वेल तयार होतोय. या सिनेमात मीनाक्षी कॅमिओ रोल साकारणार आहे. मुंबईतील कमालिस्तान स्टुडिओत या सिनेमाचे शूटिंग सुरु होणार आहे. अभिनेत्री सोहा अली खान सिनेमात डॉक्टरच्या भूमिकेत झळकणार असून टिस्का चोप्राचीही महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
एकेकाळी आपल्या ग्लॅमरस अदांनी प्रेक्षकांची मने जिंकणा-या मीनाक्षीने आता वयाची 51 वर्षे पूर्ण केली आहेत. इन्व्हेस्टमेंट बँकर हरीश मैसूर यांच्याशी मीनाक्षीचे लग्न झाले आहे. मुलगी केंद्रा आणि मुलगा जोश, या दोन मुलांची आई असलेली मीनाक्षी अमेरिकेतील टेक्सासमधील प्लॅनो येथे राहते. हरीशसोबत मीनाक्षीने न्यूयॉर्क येथे रजिस्टर्ड मॅरेज केले होते. आता ती येथे डान्स अकॅडमी चालवते. वयाची पन्नाशी ओलांडलेल्या मीनाक्षीच्या लूकमध्येसुद्धा वयानूसार बराच बदल झालेला दिसतोय.
पुढील स्लाईड्समध्ये तुम्ही मीनाक्षीची लेटेस्ट छायाचित्रे बघू शकता...