Home »Gossip» This Is How Reena Roy Looks Like Now

आता अशी दिसते शत्रुघ्न सिन्हांची Ex-GF, एकेकाळी होती बॉलिवूडची आघाडीची अॅक्ट्रेस

दिव्य मराठी वेब टीम | Aug 12, 2017, 14:06 PM IST

मुंबई- रिना रॉय ही 70 आणि 80 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. 1973 साली 'जरुरत' या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणा-या रिनाने नागिन, अपनापन, आशा यांसारख्या सिनेमांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. रिना पडद्यावर जेवढी लोकप्रिय ठरली तेवढीच तिच्या लव्ह लाइफचीही चर्चा झाली.
रिनाची जोडी शत्रुघ्न सिन्हांसोबत कालीचरण (1976), चोर हो तो ऐसा (1978), हीरा मोती (1979), माटी मांगे खून (1984) या सिनेमांमध्ये जमली. यावेळी दोघांच्या ऑन स्क्रिनच नव्हे तर ऑफ स्क्रिन केमिस्ट्रीचीही चांगलीच चर्चा रंगली. 7 जानेवारी 1957 रोजी तिचा जन्म झाला. शत्रुघ्न सिन्हासोबतचे अफेअर असो, किंवा पाकिस्तानी क्रिकेटर मोहसीन खानसोबत दोनदा लग्न असो, रीनाचे खासगी आयुष्य अनेक खाचखळग्यांनी भरले होते. बालपणीपासूनच तिने अडचणींचा सामना केलाय.
उदरनिर्वाहासाठी वळली होती सिनेसृष्टीकडे...
- रीना रॉयचे खरे नाव रुपा असून तिचा जन्म मुंबईत झाला होता. रीनाचे वडील मुस्लिम तर आई हिंदू होती. रीनाच्या आईवडिलांचे लग्न फार काळ टिकले नाही आणि त्यांचा घटस्फोट झाला होता.
- आई आणि बहिण-भावांच्या उदरनिर्वाहासाठी रीनाने फार कमी वयात आपले फिल्मी करिअर सुरु केले होते.
- 1973 मध्ये आलेला 'जरुरत' हा रीनाचा पहिला सिनेमा होता. या सिनेमानंतर रीना 'जरुरत गर्ल' या नावाने प्रसिद्ध झाली होती.
- या सिनेमानंतर बी. आर. चोप्रा यांनी रीनाला 'नई दुनिया नए लोग' या सिनेमासाठी साईन केले होते. मात्र काही कारणास्तव हा सिनेमा तयार होऊ शकला नाही.
- रीनाला करिअरच्या सुरुवातीच्या काळात अपयशाला सामोरे जावे लागले होते. 'मिलाप', 'जंगल में मंगल' आणि 'उम्रकैद' हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटले होते.
- मात्र 1976 साली रिलीज झालेल्या 'नागिन' या सिनेमामुळे रीना यशोशिखरावर पोहोचली. या सिनेमातील अभिनयासाठी रीनाला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते.
- त्यानंतर 1977 मध्ये आलेल्या 'अपनापन' या सिनेमासाठी रीनाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट सहअभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. 1980 मध्ये आलेल्या 'आशा' सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिळाले होते.
- आपल्या करिअरमध्ये रीनाने जवळपास शंभरहून अधिक सिनेमांमध्ये काम केले. नागिन, कालिचरण, जानी दुश्मन, प्यासा सावन, अर्पण, आशा, धर्म काटा, सौ दिन सास के, आदमी खिलौना है, हे रीनाचे गाजलेले सिनेमे आहेत.
- बॉलिवूडमध्ये यशस्वी घौडदौड सुरु असताना रीनाचे अफेअर अभिनेता शत्रुघ्न सिन्हाबरोबर होते. दोघांनी बरेच दिवस एकत्र डेट केले. मात्र शत्रुघ्न यांनी रीनाला सोडले आणि पूनमबरोबर लग्न करुन सगळ्यांना चकित केले होते.

पुढे वाचा, या दोघांच्या लव्ह स्टोरीत कसे आले ट्विस्ट...

Next Article

Recommended