आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दोन मुलींची आई आहे सलमानची \'जुडवां\' गर्ल, 19 वर्षांत बदलला लूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : अभिनेता सलमान खानच्या 'जुडवां' (1997) या सिनेमातील अॅक्ट्रेस रंभाचे काही फोटोज सध्या इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. या फोटोजमध्ये रंभाला ओळखणेही कठीण झाले आहे. 17 बॉलिवूड आणि 100 हून अधिक साऊथ इंडियन सिनेमांमध्ये झळकलेली 40 वर्षीय रंभा आता ग्लॅमर इंडस्ट्री सोडून तिच्या दोन मुलींच्या संगोपनात बिझी आहे. 

वयाच्या 16 व्या वर्षी केले होते डेब्यू... 
रंभाने कमी वयातच फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण केले होते. सिनेसृष्टीतील एन्ट्रीवेळी रंभा केवळ 16 वर्षांची होती.  'सरगम' या मल्याळम सिनेमातून तिने इंडस्ट्रीत एन्ट्री घेतली. त्यानंतर 1995 मध्ये 'जल्लाद' या सिनेमातून ती बॉलिवूडकडे वळली होती.  'दानवीर', 'जंग', 'कहर', 'जुडवां', 'सजना', 'घरवाली बाहरवाली', 'बंधन', 'मैं तेरे प्यार में पागल', 'क्रोध', 'बेटी नंबर वन', 'दिल ही दिल में', 'प्यार दीवाना होता है' हे तिचे गाजलेले बॉलिवूड सिनेमे आहेत. सलमानसोबतच तिने रजनीकांत, गोविंदा, अक्षय कुमार, अजय देवगण, मिथुन चक्रवर्ती या सुपरस्टार्ससोबत रंभाने काम केले आहे. "फिल्मस्टार' या मल्याळम सिनेमात रंभा शेवटची झळकली होती. 

दोन मुलींची आई आहे रंभा...
सिनेमांपासून दूर असलेल्या रंभाने 2010 मध्ये बिजनेसमन इंद्राण पद्मनाथनसोबत लग्न केले.  2011 मध्ये तिची मोठी मुलगी लान्या आणि 2015मध्ये धाकटी मुलगी साशाचा जन्म झाला. सोशल मीडियावर अॅक्टिव रंभा फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर नेहमीच तिचे आणि तिच्या फॅमिलीचे फोटोज शेअर करत असते. एवढ्या वर्षांत तिचा लूक बराच बदलेला दिसतोय. 

पुढील स्लाईड्समध्ये बघा, फॅमिलीसोबतचे रंभाचे Latest Photos...