आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत वरुण धवनचे सख्खे काका, रणबीरच्या आईसोबत केला आहे स्क्रिनवर रोमान्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
​वरुण धवन आणि अनिल धवन. इनसेटमध्ये 'हवस' चित्रपटातील एका दृश्यात नीतू सिंग यांच्यासोबत अनिल धवन. - Divya Marathi
​वरुण धवन आणि अनिल धवन. इनसेटमध्ये 'हवस' चित्रपटातील एका दृश्यात नीतू सिंग यांच्यासोबत अनिल धवन.
एंटरटेन्मेंट डेस्कः  अभिनेता वरुण धवनचा 'जुडवां 2' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला बिझनेस करत आहे. रिलीजच्या केवळ चार दिवसांत या चित्रपटाने तब्बल 77 कोटींचा गल्ला जमवला आहे. तसं पाहता, वरुणच्या फॅमिली मेंबर्सविषयी बरंच काही त्याच्या चाहत्यांना ठाऊक आहे. पण काही नातेवाईकांना मात्र लोक फारसे ओळखत नाहीत. वरुण धवनचे काका अनिल धवन हेदेखील अभिनेते असून अनेक चित्रपटांमध्ये ते झळकले आहेत. इतकेच नाही तर  त्यांनी काही मालिकांमध्येही अभिनय केला आहे. रणबीर कपूरची आई आणि ऋषी कपूर यांच्या पत्नी नीतू सिंग यांच्यासोबतही अनिल धवन यांनी काम केले आहे. 
 
रणबीर कपूरच्या आईसोबत केला स्क्रिनवर रोमान्स...
वरुण धवनचे काका अर्थातच अभिनेते अनिल धवन यांनी बॉलिवूडच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांनी रणबीर कपूरची आई नीतू सिंग यांच्यासोबत स्क्रिनवर रोमान्स केला आहे. 1974 साली रिलीज झालेल्या  'हवस' या चित्रपटात दोघांनी एकत्र काम केले होते.  अनिल यांनी 'चेतना' (1970) या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.  'प्यार की कहानी' (1971), 'पिया का घर' (1972), 'नागिन' (1976), 'पुरानी हवेली' (1989), 'करिश्मा काली का' (1990), 'तेरी तलाश में' (1990), 'होगी प्यार की जीत' (1999), 'जोड़ी नबंर 1' (2001), 'सनम हम आपके हैं' (2009), 'रास्कल्स' (2011) सह अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. पण चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात ते फारसे यशस्वी ठरले नाहीत. 

पुढील स्लाईड्सवर वाचा, अनिल धवन यांच्याविषयी बरंच काही...  
बातम्या आणखी आहेत...