आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चक दे इंडियाला झाले १० वर्ष पूर्ण, आता काय करताय या चित्रपटाची \'गर्ल्स गँग\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘चक दे इंडिया’रिलीज होऊन 10 |ऑगस्ट रोजी दहा वर्ष पूर्ण झाले आहेत. रिलीजच्या दहा वर्षानंतरही या चित्रपटाला अजून कोणीही विसरलेले नाही. याचे कारण हे की, चित्रपट रिलीज होण्याअगोदरच याचे टायटल स्लोगन बनले होते. आज हॉकी असो अथवा क्रिकेट  ‘चक दे इंडिया’हे गाणे आपल्याला नक्कीच ऐकायला मिळेल. या चित्रपटातील गाण्याप्रमाणेच यातील कलाकारांनाही कोणीही विसरु शकणार नाही. भलेही शाहरुखला चित्रपटात या टीमला एकत्र आणण्यासाठी मेहनत करावी लागली पण आजही ही टीम 10 वर्षानंतरही एखाद्या टीमप्रमाणेच राहते. 
 
या चित्रपटातील शिल्पा शुक्ला (बिंदिया नायक) आणि आर्या मेनन (गुल इकबाल) यांनी सांगितले की, आजही त्या एकमेकांच्या संपर्कात आहेत. जीवनात कोणताही प्रॉब्लेम आला तरी तो एकमेकांशी शेअर करतो असे त्यांनी सांगितले. यावरुन ‘चक दे गर्ल्स’जरी वेगळ्या झाल्या असल्या तरी ते एकमेकांसोबतच आहेत. 
 
चित्रपटाचे दिग्दर्शक शिमित अमिन आणि लेखक जयदीप साहनी यांनी एक किस्सा शेअर करताना सांगितले की, हा चित्रपट रिलीजअगोदर काही मित्र, कुटुंबियांना दाखवला होता तेव्हा चित्रपटात शाहरुख खान तर आहे पण कोणी हिरोईन नाही, अशी त्यांची प्रतिक्रिया होती. पण रिलीज झाल्यानंतर चित्रपट सर्वांना आवडला. 
तर आज जाणून घेऊया. चित्रपटातील सर्व कलाकार आज कुठे आहेत आणि काय करत आहेत...

सागरिका घाटगे (प्रीति सभरवाल)
सागरीका नुकतीच नसरुद्दीन शाह यांच्यासोबत  'इरादा' चित्रपटात दिसून आली होती. क्रिकेटर जहीर खानसोबत तिचा साखरपुडा झाला असून ती लवकरच लग्नही करणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटातही तिचा प्रियकर क्रिकेटर दाखवण्यात आला होता. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, बाकी अभिनेत्रींविषयी...
बातम्या आणखी आहेत...