आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सागरिकाचे झाले लग्न, जाणून घ्या आता कुठे आणि काय करते ‘चक दे इंडिया’ची 'गर्ल गँग'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘चक दे इंडिया’या चित्रपटामुळे लाइमलाइटमध्ये आलेली अभिनेत्री सागरिका घाटगे 23 नोव्हेंबर क्रिकेटपटू झहीर खानसोबत विवाहबद्ध झाली. नोंदणीपद्धतीने दोघांनी लग्न केले. 2007 साली 'चक दे इंडिया' या चित्रपटातून सागरिकाने फिल्म इंडस्ट्रीत पाऊल ठेवले. या चित्रपटात तिने प्रीती सभरवाल ही व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटानंतर तिने फॉक्स, मिले ना मिले हम, रश, जी भर के जी ले, इरादा या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले. शिवाय प्रेमाची गोष्ट या चित्रपटातून तिची मराठी चित्रपटसृष्टीतही एन्ट्री झाली आहे. सध्या सागरिकाच्या हातात एकाही चित्रपटाची ऑफर नाहीये. 

 

चित्रपटाच्या रिलीजला झाली 10 वर्षे... 
'चक दे इंडिया' या चित्रपटाच्या रिलीजला याचवर्षी 10 ऑगस्टला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. रिलीजच्या दहा वर्षानंतरही या चित्रपटाला अजून कोणीही विसरलेले नाही. शाहरुख खानसोबत सागरिका घाटगे, शिल्पा शुक्ला, आर्या मेनन, अनाइता नायर, विद्या माळवदे, चित्राशी रावत, तान्या अबरोल, मसोचोन, सीमा आजमी, शुभी मेहता, सांडिया फर्टाडो ही गर्ल गँग मुख्य भूमिकेत झळकली होती. सागरिकाच्या वेडिंग रिसेप्शनला विद्या माळवदे आणि चित्राशी रावत यांनी उपस्थिती लावली होती. चित्रपटाच्या रिलीजला दहा वर्षांचा काळ लोटला असला तरी या सर्व अभिनेत्री आजही एकमेकींच्या संपर्कात आहेत.

 

आजही एकमेकींच्या संपर्कात आहे चक दे गर्ल्स..     
या चित्रपटातील शिल्पा शुक्ला (बिंदिया नायक) आणि आर्या मेनन (गुल इकबाल) यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की आजही त्या एकमेकींच्या संपर्कात आहेत. जीवनात कोणताही प्रॉब्लेम आला तरी तो एकमेकांशी शेअर करतो. चित्रपटाचे दिग्दर्शक शिमित अमिन आणि लेखक जयदीप साहनी यांनी एक किस्सा शेअर करताना सांगितले की, हा चित्रपट रिलीजअगोदर काही मित्र, कुटुंबियांना दाखवला होता तेव्हा चित्रपटात शाहरुख खान तर आहे पण कोणी हिरोईन नाही, अशी त्यांची प्रतिक्रिया होती. पण रिलीज झाल्यानंतर चित्रपट सर्वांना आवडला.

 

जाणून घेऊयात, चित्रपटातील या सर्व अभिनेत्री आज आज कुठे आहेत आणि काय करतात... 

 

बातम्या आणखी आहेत...