आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमानची सावली आहे ही व्यक्ती, त्याच्यासाठी काढून टाकली डोक्यावरची पगडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सलमानसोबत शेरा - Divya Marathi
सलमानसोबत शेरा
बॉलिवूडचा दबंग अर्थातच अभिनेता सलमान खानची सोबत मिळवण्यासाठी कोट्यवधी लोग तळमळतात. परंतु एक व्यक्ती अशी आहे, जी नेहमी सलमानसोबत राहते. कोणत्याही ठिकाणी आणि कोणत्याही परिस्थितीत ही व्यक्ती सलमानचा साथ सोडत नाही. ही व्यक्ती आहे, सलमानचा बॉडीगार्ड शेरा. शेरा दोन दशकांपासून सलमानची सावलीच नव्हे तर त्याच्याशी संबंधित सर्व गोष्टींचा साक्षीदार आहे.
सलमानसोबत काम करण्यापूर्वी केसांना पगडी घालत होता शेरा...
- शेराला बालपणीपासूनच बॉडी बिल्डींगचा शौक आहे. त्यामुळेच तो 1987मध्ये ज्यूनिअर मिस्टर मुंबई आणि त्याच्या पुढच्या वर्षी ज्यूनिअर वर्गात मिस्टर महाराष्ट्र म्हणून निवडला गेला.
- शिख कुटुंबात जन्मलेल्या शेराच्या वडिलांचे मुंबईमध्ये गाडी रिपेअर करण्याचे वर्कशॉप होते. परंतु घरात एकुलता एक असलेल्या शेराने वेगळे क्षेत्र निवडले.
- एका मित्राच्या सांगण्यावरून शेराने सिनेसृष्टीतील कलाकार आणि बिझनेमन यांच्या सुरक्षा उपलब्ध करून देण्याचे काम सुरु केले.
- सुरुवातीला शेरा काही बॉलिवूड कलाकारांसोबत हॉलिवूड कलाकारांनासुध्दा भारतात शूटिंगला आल्यानंतर सुरक्षा देऊ लागला.
- 1995 हे वर्षे त्याच्यासाठी टर्निंग पॉइंट ठरले. सोहेल खानने शेराकडे सलमानसाठी परदेशी दौ-यासाठी सुरक्षा मागितली.
- त्याच्या सेवेने प्रसन्न झालेल्या सलमानने त्याला नेहमीसाठी आपला बॉडीगार्ड म्हणून ठेवले. त्यानंतर तो सलमानच्या घरातील सदस्य बनला.
- सलमानला चाहत्यांच्या गर्दीतून सुरक्षित बाहेर काढण्याताना शेराला आपल्या डोक्यावरील पगडी अडथळा निर्माण करत असल्याचे जाणवले.
- त्याने कर्तव्य प्रामाणिकपणे पूर्ण करण्यासाठी आपल्या केसांचा कुर्बानी दिली.
कुटुंबातील सदस्यासारखे मानतो सलमान...
- सलमानने नेहमी शेराला आपल्या कुटुंबातील सदस्य मानले आहे. सलमानने एका सिनेमात बॉडीगार्डच्या भूमिकेसाठी शेराची प्रेरणा घेऊ भूमिका केली होती.
- या सिनेमात सलमानला एका सिक्युरिटी एजेन्सीचा लोगो लावण्यासाठी सात लाख रुपयांची ऑफर मिळाली होती. परंतु सलमानने ही ऑफर नाकारून शेराची कंपनी टायगर सिक्युरिटीचा लोगो लावला होता.
- सलमानच्या सुरक्षेदरम्यान शेरा नेहमी शांत असतो. तो सांगतो, आमच्या व्यावसायात असे राहणे गरजेचे असते.
- शेरा कुणासोबतच बोलत नाही. जर कुणी असा प्रयत्न केलाच तर विनम्रपणे नकार देतो.
- सलमान शेराचा मुलगा टायगरला बॉलिवूडमध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सलमानचे शेरासोबतचे फोटो...