आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाला डायरेक्टर म्हणाला ट्रान्सजेंडर, जॅकी श्रॉफच्या पत्नीने दिले सडेतोड उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : विद्युत जामवालने राम गोपाल वर्माचा एक ऑडियो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. यामध्ये तो दारुच्या नशेत टायगर श्रॉफला ट्रान्सजेंडर आणि सर्वात सुंदर महिला म्हणताना दिसत आहे. टायगरवर झालेल्या या कमेंटवर त्याची आई आएशा श्रॉफने तिखट प्रतिक्रिया दिलीये. एका पोर्टलला दिलेल्या इंटरव्ह्यूमध्ये आएशा म्हणाली - "जब कारवां चलता है तो कुत्ते भौंकते ही है" (While the dogs bark, the caravan passes on) काय म्हणतात जॅकी आणि कृष्णा श्रॉफ...
 
- राम गोपाल वर्माची अपकमिंग फिल्म 'सरकार-3' मध्ये जॅकी प्रमुख भूमिकेत आहे. ज्यावेळी टायगरवर झालेल्या कमेंटविषयी जॅकी श्रॉफला विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला की, मी काय बोलू शकतो? माझ्या मुलाचा लोकांवर इतरा प्रभाव आहे की, लोक काम सोडून त्याच्यावर कमेंट करत आहेत.

- तर टायगरची बहिण कृष्णा म्हणाली की, मला माझ्या भावावर गर्व आहे. कारण खुप कमी वेळेत त्याने दिर्घकाळापासून इंडस्ट्रीमध्ये असणा-या लोकांनावर प्रभाव टाकला आहे. 
टायगर म्हणाला की, मनातली गोष्ट सांगितली तर योग्य वाटणार नाही

- राम गोपाल वर्माच्या या कमेंटवर टायगरला विचारण्यात आले तर तो म्हणाला - ''मन की बात बोलूं तो सही नहीं होगा.

- राम गोपाल वर्मा अनेक वर्षांपासून इंडस्ट्रीमध्ये आहेत आणि माझे सीनियर आहेत. मी आत्ताच इंडस्ट्री जॉइन केलीये आणि येथे नवीन आहे. मी यावर काहीच कमेंट करणार नाही कारण यामुळे माझे आई-वडिल लाजिरवाणे होऊ शकतात.

राम गोपाल वर्मा टायगरला म्हणाला सुंदर महिला, जाणुन घ्या यावर डायरेक्टर फराह खानचे रिअॅक्शन...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)


 
बातम्या आणखी आहेत...