आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जॅकी श्रॉफच्या मुलीने पोस्ट केला Hot फोटो, धुडकावून लावल्या आहेत बॉलिवूड फिल्म्सच्या ऑफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूडचे जॅकीदादा अर्थातच अभिनेते जॅकी श्रॉफ यांची लाडकी लेक आणि अभिनेता टायगर श्रॉफची बहीण कृष्णा श्रॉफ बोल्डनेसमध्ये कुठल्याही बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा मागे नाहीये. उलट कृष्णा त्यांच्या एक पाऊल पुढेच आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याचे कारण म्हणजे जॅकीदादांची ही लेक अद्याप सिनेसृष्टीत आली नाही, मात्र येथील बोल्डनेस ती शिकली आहे.
अलीकडेच कृष्णाने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर बेड सीरिजच्या फोटोशूटचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. फोटोशूटमध्ये कृष्णाचा ग्लॅमरस अंदाज लक्ष वेधून घेतोय. कृष्णा नेहमीच तिचा ब्राझिलियन बॉयफ्रेंड स्पेंसर जॉनसनसोबतचे फोटोज शेअर करत असते.

टायगर हीरो तर कृष्णा बनली डायरेक्टर...
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगरने 'हीरोपंती' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. भावाच्या अगदी उलट कृष्णाने कॅमे-यामागे राहणे पसंत केले आहे. कृष्णा श्रॉफने ट्रान्सजेंडर कम्युनिटीवर आधारित एक डॉक्युमेंट्री दिग्दर्शित केले असून स्वतः ती शूट केली आहे.

नाकारली करण जोहरच्या सिनेमाची ऑफर
कृष्णाला अभिनयात मुळीच रुची नाही. तिला करण जोहरने 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमासाठी विचारणा केली होती. मात्र कृष्णाने ही भूमिका नाकारली आणि नंतर या सिनेमासाठी आलिया भटची वर्णी लागली.


बॉयफ्रेंडसोबतचे फोटोज शेअर करुन एवटली चर्चा...

कृष्णा श्रॉफ आपल्या ब्राझिलिअन प्रियकरासोबतच्या अफेअरच्या बातम्यांनी काही दिवसांपूर्वीच चर्चेत आली होती. स्पेन्सर जॉनसन हे कृष्णाच्या बॉयफ्रेंडचे नाव असून जॅकी श्रॉफ यांनी त्यांच्या नात्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती'च्या सक्सेस पार्टीमध्ये स्पेन्सर सहभागी झाला होता. कृष्णा दोन ते तीन वर्षांपासून दिवसांपासून जॉनसनला डेट करत आहे. तिने आपल्या या प्रियकरासोबतची अनेक छायाचित्रे आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअरसुद्धा केली आहेत. सुत्राच्या माहितीनुसार, 'जॉनसन फुटबॉल ट्रेनर असून KOOH स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये मॅनेजर आहे. तो मुंबईमध्ये राहत आहे.'
पुढील स्लाइड्समध्ये पाहा, ग्लॅमरस कृष्णाची खास छायाचित्रे.
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...