आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्जुन कपूरच्या आजीने केली होती श्रीदेवीला मारहाण, वाचा बी टाऊनच्या Top Controversies

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमध्ये कधी काय घडेल याचा काही नेम नसतो. कधी विवाहित पुरुष आपल्या पत्नीला दगा देऊन दुस-याच स्त्रीशी संबंध ठेवतो, तर कधी सार्वजनिक ठिकाणी एखादी अभिनेत्री आपल्या को-स्टारच्या थोबाडीत लगावते, अशा एक ना अनेक कॉन्ट्रोव्हर्सीज बॉलिवूडमध्ये बघायला मिळतात. बॉलिवूडमध्ये अभिनेत्रींमध्ये रंगत असलेल्या कॅट फाईटचीही विशेष चर्चा होत असते. बॉलिवूडमध्ये अशा अनेक सेलिब्रिटी आहेत, ज्यांच्यातून विस्तवसुद्धा जाऊ शकत नाही. मग त्यांच्यात मैत्री होणे तर अतिशय अशक्य अशी बाब आहे. आज या रिपोर्टमधून आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या काही गाजलेल्या कॅट फाइटविषयी सांगत आहोत. बॉलिवूडमधील गाजलेली ‘टॉप’ भांडणे अर्थातच ‘कॅट फाईट’विषयी जाणून घेऊयात...
मोना कपूर V/S श्रीदेवी
पहिली पत्नी मोना कपूर आणि दोन मुलांना मागे सोडत निर्माते-दिग्दर्शक बोनी कपूर यांनी श्रीदेवीसोबत दुसरे लग्न थाटून सर्वांना मोठा धक्का दिला होता. विशेष म्हणजे श्रीदेवी बोनीची पाहुणी म्हणून अनेक दिवस मोना कपूर यांच्या घरी वास्तव्याला होती. त्यावेळी बोनी आणि श्रीदेवी यांचे अफेअर सुरु असल्याची कुणकुणही मोना कपूर यांना लागली नव्हती. मात्र नंतर जेव्हा त्यांचे नाते मोना यांच्यासमोर उघड झाले तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. तेव्हापासून मोना आणि श्रीदेवी यांच्यातील वाद जगापासून लपला नाही. जेव्हा बोनी कपूर यांनी श्रीदेवीसोबत लग्नाचा निर्णय घेतला, त्यावेळी श्रीदेवी प्रेग्नेंट होती. श्रीदेवीने आपल्या मुलीचा संसार मोडला म्हणून मोना कपूर यांच्या आई तिच्यावर वैतागल्या होत्या. असे म्हटले जाते, की एका पार्टीत मोना कपूर यांच्या आईने श्रीदेवीला मुलीचा संसार मोडला म्हणून मारहाण केली होती. अभिनेत्री अर्चना पुरण सिंगने काही वर्षांपूर्वी ही गोष्ट उघड केली होती. आता मोना कपूर हयात नाहीत. कॅन्सरमुळे दोन वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन वाचा, बॉलिवूड अभिनेत्रींची 'टॉप' भांडणे...