आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य, विशालसह या 15 Celebsवर लागला आहे लैंगिक शोषणाचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः आदित्य पांचोली, विशाल ठक्कर - Divya Marathi
फाइल फोटोः आदित्य पांचोली, विशाल ठक्कर
लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार करण्याच्या आरोपाखाली अभिनेता विशाल ठक्कर याला चारकोप पोलिसांनी अटक केली आहे. एका 27 वर्षीय तरुणीने विशाल विरोधात तक्रार केली होती. तेव्हापासून विशाल अटक टाळण्याचा प्रयत्न करत होता. अखेर पोलिसांनी विशाल याला त्याच्या मित्राच्या घरातून अटक केली. चाँदनी बार, मुन्नाभाई एमबीबीएस, टँगो चार्ली या सिनेमांमध्ये विशालने काम केले आहे.
यापूर्वीही मधुर भंडारकर, शायनी आहुजा आणि आदित्य पांचोलीसह अनेक कलाकारांवर लैंगिक शोषणाचा आरोप लागला आहे. या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला या आरोपात अडकलेल्या कलाकारांविषयी सांगत आहोत...
आदित्यवर लागला होता मोलकरणीवर बलात्काराचा आरोप
आदित्य पंचोलीचे आयूष्यात सतत काही ना काही वाद झाले आहेत. कधी तो विवाहित असून कंगना राणावतसोबत अफेअरच्या कारणामुळे तर कधी अभिनेत्री जिया खानच्या आत्महत्येनंतर आपल्या मुलावर झालेल्या आरोपामुळे चर्चेत राहिला आहे. याशिवाय आपल्या शेजार्‍यांशी शिवीगाळ करण्याचा आरोपही त्याच्यावर लागतात. परंतू बॉलिवूडला धक्का बसला जेव्हा त्याच्यावर घरातल्या मोलकरणीवर बलात्कार केल्याचा आरोप झाला होता. त्यावेळी तो पूजा बेदीला डेट करत होता. पूजाने 2007 मध्ये एका मुलाखातीत सांगितले होते की, तिचे आणि आदित्यचे नातं तुटण्याचे एकमेव कारण म्हणजे त्या मोलकरणीसोबत झालेले लैंगिक शोषण हे आहे. 2009 मध्ये पूजाने बलात्काराच्या आरोपात अडकलेल्या शायनी अहूजाच्या पत्नीला हाच सल्ला दिला होता की, आधी तिने बलात्कार झाला आहे की नाही याची खात्री करून घ्यावी कारण अशा आरोपांमुळेच तिचे आदित्यशी ब्रेक-अप झाले होते.
पुढील स्लाईड्मध्ये जाणून घ्या इतर सेलिब्रिटींविषयी...