(आर. माधवन आणि कंगना रनोट)
मुंबईः कंगना रनोट आणि आर. माधवनच्या 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर शानदार कमाई केली आहे. 22 मे रोजी रिलीज झालेला हा सिनेमा शंभर कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. रिलीजच्या आठव्याच दिवशी या सिनेमा तिकिटबारीवल 101.67 कोटींचा गल्ला जमवला.
खरं तर आजच्या काळात फिल्ममेकिंग वाटते तितके सोपे नाहीये. जर सिनेमात एकही चूक झाली तर ती निर्मात्याची खिल्ली उडवण्यास पात्र ठरते. बॉलिवूडच्या अनेक सिनेमांत अशा छोट्या-मोठ्या चूका नेहमी आढळून येतात. अशाच काही चुका दिग्दर्शक आनंद एल. राय यांनी 'तनू वेड्स मनू रिटर्न्स' या सिनेमात केल्या आहेत.
Mistake 1
सिनेमाच्या ओपनिंग सीनमध्ये तनू आणि मनू वैवाहिक आयुष्यात निर्माण झालेल्या अडचणींमुळे तणावात आहेत. यासाठी ते मेंटल असायलममध्ये पोहोचतात. मात्र सामान्य आयुष्यात पती-पत्नीमध्ये वाद झाल्यास ते दूर करण्यासाठी थेरपिस्टकडे जात असतात. झाली ना चुक...
Mistake 2
चंदीगडमध्ये बराच ड्रामा घडल्यानंतर पप्पी त्याची प्रेयसी कोमलचे अपहरण करण्यात यशस्वी होते. मनू आणि दत्तोच्या मदतीने तो तिला किडनॅप करतो. मात्र या सीननंतर कोमला सिनेमातून आउट ऑफ सीन करण्यात आले आहे. मनू-दत्तोच्या लग्नावेळी कोमलचा उल्लेखसुद्धा होत नाही. अगदी एन्ड क्रेडिटमध्ये तिला दाखवण्यात आले आहे. खरं तर किडनॅप झाल्यानंतर एखादी तरुणी पळून जाण्याचा किंवा मदतीचा हात मागताना दिसते. मात्र दिग्दर्शक मनू-दत्तोच्या लग्नात एवढे बिझी झाले, की त्यांनी कोमल-पप्पीच्या लव्हस्टोरीकडे सरळसरळ दुर्लक्ष केले.
Mistake 3
हिंदू धर्मानुसार दुसरे लग्न करण्यापूर्वी पहिल्या पत्नीला घटस्फोट देणे गरजेचे असते. मात्र कायदेशीर कारवाई न करतात, मनू (आर. माधवन) पहिली पत्नी तनुजा त्रिवेदीला सोडून कुसुमसोबत दुसरे लग्न करण्यास तयार होते.
असो, सिनेमातील कितीही अशा छोट्या-मोठ्या चुका झाल्या असल्या तरीदेखील या रोमान्स-कॉमेडी धाटणीच्या सिनेमाने प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. तनू वेड्स मनू रिटर्न्सप्रमाणेच बॉलिवूडमधील अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये अशा चुका झाल्या आहेत. divyamarathi.com तुम्हाला अशाच काही सिनेमांतील चूकांविषयी सांगत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, सिनेमांमध्ये झालेल्या ब्लंडर्सविषयी...