आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाहुबली'ने कमावले होते 602 कोटी, 100 कोटी क्लबमध्ये सामील आहेत साऊथचे हे 20 सिनेमे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः एस. एस. राजामौली यांचा 'बाहुबली' यांच्या या साऊथ इंडियन सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. 10 जुलै 2015 रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर सुमारे 602 कोटींची कमाई केली आहे. हा सिनेमा साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्रीतील सर्वाधिक कमाई करणारा  पहिला सिनेमा आहे. 
 
सलमानच्या 'सुल्तान'ला टाकले मागे... 
प्रभास, राणा डग्गुबती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया स्टारर या सिनेमाने सलमान खान स्टारर 'सुल्तान' या सिनेमाच्या वर्ल्डवाइड कलेक्शनला मागे टाकले आहे. 'सुल्तान'चा वर्ल्डवाइड बिझनेस हा 589 कोटींच्या घरात होता.
 
बाहुबलीच्या पुढे आहेत फक्त 'पीके' आणि 'बजरंगी भाईजान' 
जगभरातील कमाईच्या आकड्यांत आमिर खानचा 'पीके' आणि सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' हे दोन सिनेमे बाहुबलीच्या पुढे आहेत. 'पीके'चे वर्ल्डवाइड कलेक्शन 792 कोटी तर 'बजरंगी भाईजान'चे 626 कोटी इतके आहे. 602 कोटींच्या कमाईसोबत 'बाहुबली' तिस-या स्थानावर आहे. 
 
दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीत शंभर कोटींपेक्षा अधिकचा बिझनेस करणारा 'बाहुबली' हा पहिला सिनेमा नाहीये. आत्तापर्यंत जवळजवळ 20 सिनेमे शंभर कोटींच्या क्लबमध्ये सामील झाले आहे. मात्र 'बाहुबली'ने केलेल्या बिझनेस या सिनेमांपेक्षा बराच मोठा आहे.

Divyamarathi.com तुम्हाला साऊथ इंडियन सिनेसृष्टीतील (तामिळ आणि तेलगू) 100 कोटींच्या क्लबमध्ये सामील झालेल्या सिनेमांविषयी सांगत आहे..

नोटः कमाईचे हे आकडे इंटरनेटवर उपलब्ध माहिती आणि वर्ल्डवाइड कलेक्शनवर आधारित आहेत.
बातम्या आणखी आहेत...