आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Top Bollywood Actresses Who Quit Acting After Marriage

असिनपूर्वी या ग्लॅमरस अभिनेत्रींनी लग्नानंतर Bollywoodला ठोकला रामराम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संगीता बिजलानी - Divya Marathi
संगीता बिजलानी
मुंबई. बिजनेसमन राहुल शर्मासोबत लग्न केल्यानंतर असिनने सिनेमात काम न करण्याचा निर्णय घेतला आहे. अलीकडेच तिने सोशल मीडियावर लिहिले, 'मी पुन्हा एकदा सांगतेय, की मी कोणताच प्रोजेक्ट साइन केला नाहीये, तुम्हाला सर्वांना विनंती आहे, की माझ्या नवीन प्रोजेक्ट्स आणि कामाविषयी काहीच अफवा पसरवू नका. सध्या मी काहीच करत नाहीये. हे मी लग्नापूर्वीसुध्दा सांगितले होते.'
असिनपूर्वी या अभिनेत्रींसुध्दा सिनेसृष्टीला ठोकला रामराम...
आपल्या कामाप्रती पॅशनेट राहणारी असिनने सिनेमांत काम करणे सोडले, की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. परंतु ती एकमेव अभिनेत्री नाहीये, जी बॉलिवूडला अलविदा म्हणणार आहे. असिनपूर्वी अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी लग्नानंतर सिनेसृष्टीला अलविदा म्हटले.
संगीता बिजलानी
वय: 55 वर्षे
पूर्वाश्रमीचा पती: मो. अजहरुद्दीन
लग्न: 1996-2010
90च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीत आपल्या सौंदर्याने आणि अभिनयाने ओळख निर्माण करणारी अभिनेत्री संगीता बिजलानीने वयाच्या 20व्या वर्षी 1980मध्ये मिस इंडियाचा किताब जिंकला होता. 1988मध्ये 'कातिल' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी संगीता 'हथियार', 'बंटवारा', 'त्रिदेव', 'जुर्म', 'इज्जत', 'युगांधर', 'योद्धा' आणि 'खून का कर्ज'सारख्या अनेक सिनेमांत दिसली.
1996मध्ये भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार मोहम्मद अजरुद्दीनसोबत लग्न केल्यानंतर तिने सिनेसृष्टीला रामराम ठोकला. मात्र, 2010मध्ये दोघांना घटस्फोट झाला. परंतु ती आजही इंडस्ट्रीपासून दूर आहे. ती सलमान खानसोबत लवकरच एका साऊथ रिमेकमधून कमबॅक करणार असल्याचे सांगितले जात आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर बॉलिवूड अभिनेत्रींविषयी...