आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी क्लिव्हेजने तर कधी \'कंडोम\'च्या वक्तव्याने, या वादांत अडकली दीपिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आज अर्थातच 5 जानेवारीला 30वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनयापासून ते अफेअरपर्यंत आणि इतर बातम्यांमुळे ती नेहमीच चर्चेत राहिते. गेल्या दोन वर्षांपासून दीपिकाच्या पदरी मोठी यश पडत आहे. मात्र कधी-कधी ती काही वादांमध्ये अडकताना दिसते.
2014मध्ये एका इंग्रजी वेबसाइटनुसार, दीपिकाच्या क्लिव्हेजबाबत एक बातमी छापण्यात आली होती. यावर दीपिकाने आक्षेप घेऊन टि्वट केले होते, 'YES!I am a Woman.I have breasts AND a cleavage! You got a problem!!??।" यानंतर काही वेळानंतर तिने आणखी एक टि्वट करून लिहिले, "Dont talk about Woman's Empowerment when YOU don't know how to RESPECT Women!".' तिच्या या टि्वटनंतर वेबसाइटने ही बातमी काढून टाकली होती. मात्र दीपिकाच्या टि्वटनंतर हे प्रकरण मिटले नाही. याचा मोठा वाद निर्माण झाला होता. ही पहिलीच वेळ नव्हती, की दीपिका इतक्या मोठ्या वादात अडकली. यापूर्वीही अनेक वादाच्या भोव-यात अडकली आहे.
रणबीरला दिला कंडोम विकण्याचा सल्ला-
दीपिका 'कॉफी विथ करण' (KWK)च्या तिस-या पर्वात आली होती. त्यावेळी तिचे रणबीरसोबत ब्रेक-अप झालेले होते. या शोमध्ये रणबीरची खिल्ली उडवत दीपिका म्हणाली होती, की रणबीरने कंडोमची जाहिरात करायला हवी.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घेऊया, दीपिकाच्या वादांवर...
बातम्या आणखी आहेत...