मुंबई - बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना नीट हिंदी बोलता येत नाही. त्यातीलच एक अभिनेत्री आहे कतरिना कैफ, आज कतरिना कैफ तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. कतरिना सध्या तिच्या चित्रपटातील डायलॉग्ज तिच डब करते पण ती जेव्हा चित्रपटसृष्टीत नवीन होती तेव्हा तिला अजिबात हिंदी येत नसे. कतरिनाने 2003 साली आलेल्या 'बूम' चित्रपटातून डेब्यू केला होता जो चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. यानंतर कतरिनाला महेश भट्ट यांनी साया या चित्रपटात भूमिका ऑफर केली होती पण हिदी येत नसल्याने तिला लगेचच चित्रपटातून काढून टाकण्यात आले आणि तिच्या जागी तारा शर्माला भूमिका देण्यात आली. त्यानंतर हिंदी शिकण्यासाठी क्लास जॉईन केला होता. 14 व्या वर्षी सुरु केली मॉडेलिंग..
1983 साली हाँगकाँग येथे कतरिनाचा जन्म झाला. फार लहान वयात कतरिनाने मॉडलिंगला सुरुवात केली. तेव्हा आणि आताच्या कतरिनाच्या लुकमध्ये आता फार फरक पडला आहे. लंडन येथे कैजाद गुस्ताज यांनी कतरिनाला एका फॅशन शो दरम्यान पाहिले आणि बूम चित्रपटाची ऑफर दिली. चित्रपट फ्लॉप झाला तरी कतरिना सर्वांच्या लक्षात राहिली. कतरिनाने आतापर्यंत 'मैंने प्यार क्यूं किया' (2005), 'हमको दीवाना कर गए' (2006), 'नमस्ते लंदन' (2007), 'पार्टनर' (2007), 'वेलकम' (2007), 'रेस' (2008), 'राजनीति' (2010), 'धूम-3' (2013) 'बार बार देखो' (2016) यांसारख्या हिट चित्रपटात काम केले आहे.
सनी लियोनी
पॉर्न स्टारपासून बॉलीवुड स्टार बनलेली सनी लिओनीलाही हिंदी बोलण्यास अवघड जाते. सनी तरीही हिंदी शिकण्यासाठी प्रयत्न करत आहे. 2012 साली जिस्म 2 या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. आतापर्यंत तिने 'जॅकपॉट' (2013), 'रागिनी एमएमएस 2' (2014), 'एक पहेली लीला' (2015), 'कुछ कुछ लोचा है' (2015), 'मस्तीजादे' (2016), 'बेइमान लव' (2016) यांसारख्या चित्रपटात काम केले.
पुढच्या स्लाईडवर वाचा, बॉलिवूडमधील अशाच काही अभिनेत्री ज्यांचे हिंदी आहे कच्चे...