आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Less Educated : 12th पर्यंत देखील शिकलेले नाहीत बॉलिवूडचे हे 5 स्टार्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः कतरिना कैफ, कंगना रनोट - Divya Marathi
फाइल फोटोः कतरिना कैफ, कंगना रनोट
एन्टरटेन्मेंट डेस्कः चाहत्यांना त्यांच्या आवडत्या बॉलिवूड स्टार्सविषयीच्या अनेक गोष्टी ठाऊक असतात. मात्र त्यांची शैक्षणिक पार्श्वभूमी फारच थोड्या लोकांना ठाऊक आहे. बी टाऊनचे अनेक स्टार्स अभ्यासात झिरो असल्याचे जाणून नक्कीच तुम्ही अचंबित व्हाल. यापैकी काही स्टार्सनी ग्रॅज्युएशन तर सोडा पण बारावी किंवा शालेय शिक्षणच पूर्ण केलेले नाही.
अशाच काही निवडक स्टार्सविषयी divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे...
कंगना रनोट
बॉलिवूडची 'क्वीन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रनोट मुळची हिमाचल प्रदेशातील आहे. 11 व्या वर्गात शिकत असताना ती केमिस्ट्री या विषयात नापास झाली होती. आपण शिक्षणात नव्हे तर दुस-या क्षेत्रात पुढे जाऊ शकतो, याची प्रचिती तिला त्यावेळी आली. तिने ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्टची देखील तयारी केली होती. मात्र ही परीक्षासुद्धा ती क्लिअर करु शकली नाही. त्यानंतर तिने शिक्षणाशी नाते तोडून दिल्लीत मॉडेलिंगला सुरुवात केली. काही वर्षांनी ती मुंबईत दाखल झाली आणि सिनेसृष्टीची वाट चोखाळली. हे सगळं करण्यात शिक्षणाशी तिचे नाते कायमचे तुटले.
कतरिना कैफ
वयाच्या 14 व्या वर्षी मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करणारी अभिनेत्री कतरिना कैफ कधी शाळेतच गेली नाही. बालपणी तिचे कुटुंबीय सतत फिरतीवर असायचे, त्यामुळे तिला कधीही शाळेत जाता आले नाही. तिच्या आईने घरीच शिकवणी लावून कतरिनाला शिकवले.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या, बी टाऊनच्या कमी शिकलेल्या स्टार्सविषयी...