जालंधर - टॉप फॅशन मॉडेल इंदर बाजवाने त्याच्या मॉडेलिंग करिअरला अलविदा करत नवीनच मार्ग निवडला आहे. रेमण्ड जाहिरातीपासून ओळख मिळवलेला इंदर त्याच्या गुड लुक्स आणि स्मार्टनेसमुळे ग्लॅमर वर्ल्डमध्ये चांगलेच नाव कमवले. इंदरने पंजाबी चित्रपटातही काम केले आहे. जाणून घ्या कोणत्या कारणाने सोडली मॉडेलिंग...
- इंदर बाजवा जालंधरच्या एका लहान गावातील बाजवाकला येथील आहे. वयाच्या 21 व्या वर्षी इंदर दिल्लीत आला आणि मॉडेलिंग सुरु केले.
- इंदर त्याच्या हॉट आणि स्मार्ट लुकमुळे फार कमी वेळेत प्रसिद्ध झाला आणि त्यामुळे त्याच्यासाठी मुंबईतील दारे उघडली गेली. इंदरने मिस्टर वर्ल्ड स्पर्धेतही भाग घेतला. यासोबतच त्याने पंजाबी चित्रपट 'साड्डे सी.एम. साब'मध्येही काम केले आहे.
- इंदरच्या 17 वर्षाच्या भावाला नशा करण्याची सवय होती त्यातच त्याचा मृत्यू झाला. याचा इंदरच्या मनात फार खोलवर परिणाम झाला.
- एका सर्वेक्षणादरम्यान कळाले की, त्याच्या गावाच्या प्रत्येक कुटुंबातील एक व्यक्ती नशेच्या आहारी गेलेला आहे त्यामुळे इंदरने त्याच्या गावात जागरुकता पसरवण्याचा निर्णय घेतला.
पुढच्या स्लाईडवर पाहा, इंदर बाजवाचे मॉडेलिंग काळातले PHOTOS..